Home /News /lifestyle /

Lunar Eclipse: चंद्रग्रहण लागलेलं असताना अशा गोष्टी करणं अशुभ मानलं जातं; येऊ शकते वाईट बातमी

Lunar Eclipse: चंद्रग्रहण लागलेलं असताना अशा गोष्टी करणं अशुभ मानलं जातं; येऊ शकते वाईट बातमी

चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण या दोन्ही ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे.

    नवी दिल्ली, 16 मे : हिंदू धर्मीय मान्यतेनुसार ग्रहण लागणं अशुभ मानलं जातं. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण या दोन्ही ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे. 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यांत 15 दिवसांच्या फरकाने दोन ग्रहणे होत आहेत. पहिले ग्रहण 30 एप्रिल रोजी सूर्यग्रहणाच्या रूपात (Lunar Eclipse 2022) झाले. आता दुसरे ग्रहण 16 मे रोजी चंद्रग्रहण आहे. या दरम्यान कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? काय करू नये, याबाबत भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे. चंद्रग्रहण वेळ - चंद्रग्रहणाची तारीख : सोमवार, 16 मे 2022 वेळ : सकाळी 07:02 ते दुपारी 12:20 पर्यंत ग्रहण काळात काय करावे - * चंद्रग्रहणाच्या वेळी किमान तुमच्या आराध्य दैवाताचा जप करा. या काळात भजन-कीर्तन करणे उत्तम असते. * यादरम्यान कुटुंबासोबत बसून गायत्री मंत्राचा जप करावा. *ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाका. असे केल्याने या गोष्टींवर ग्रहणाचा प्रभाव पडणार नाही. *ग्रहण संपल्यानंतर तुळस मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे. * ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. *ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीची पाने टाकून हनुमान चालिसाचा पाठ करावा. हे वाचा - केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय चंद्रग्रहण काळात काय करू नये - * धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये. * ग्रहणकाळात पूजा करू नये आणि मंदिराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत, असे सांगितले जाते. * जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्या काळात कोणीही झोपू नये. * चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडणे टाळावे. याचा त्यांच्या भावी बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो. हे वाचा - लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत * मान्यतेनुसार ग्रहणकाळात झाडांनाही हात लावू नये. * ग्रहणकाळात कोणत्याही व्यक्तीने तीक्ष्ण व टोकदार वस्तू हातात धरू नये, वापरू नयेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर अंवलंबून आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Eclipse, Rashichark

    पुढील बातम्या