Lunar Eclipse 2020: चंद्राच्या कलेच्या आपल्या लव्ह लाइफवर काय होणार परिणाम

Lunar Eclipse 2020: चंद्राच्या कलेच्या आपल्या लव्ह लाइफवर काय होणार परिणाम

आकाशातला चंद्र तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडत असतो असं मानलं जातं. त्याचबरोबर प्रेम जीवनावरदेखील याचा प्रभाव पडत असतो.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : आकाशातला चंद्र तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडत असतो असं मानलं जातं. त्याचबरोबर प्रेम जीवनावरदेखील याचा प्रभाव पडत असतो. हा चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा असू शकतो. ग्रहांच्या हालचालींवर आधारित ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रिलेशनशिपमध्ये काही जण शुक्र आणि मंगळ ग्रहाला शुभ मानतात. त्याचबरोबर चंद्रदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. रिलेशनशिपमध्ये इमोशन आणि सेक्शुअल डिझायरमध्ये चंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुमच्या सेक्स लाईफ, डेट आणि प्रेम यामध्ये बदल अनुभवू शकता. सिंगल व्यक्ती देखील याद्वारे आयुष्यात बदल घडवू शकतात.

1) न्यू मून

पौर्णिमेच्या चक्राची सुरुवात नवीन चंद्राने होते. संपूर्ण काळ्या रात्री म्हणजे अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी नवीन चंद्र दिसतो. यादरम्यान तुम्ही तुमचं डेटिंग लाईफ कसं आहे आणि त्यामधून तुम्हाला काय हवं याचा विचार करायला हवा. जर तुम्ही सिंगल असाल तर या दिवसात डेटिंगसाठी प्रयत्न करू शकता. डेटिंग अपवर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा शोध घेऊ शकता. जर तुम्हाला यावर जोडीदार मिळाला तर तुमचं नातं पुढे कसं असावं याचा तुम्ही विचार करायला हवा.

2) वॅक्सिंग क्रिसेंट मून

या काळात चंद्राचा प्रकाश बदलत जातो. या काळात तुम्ही तुमचं प्रेम वृद्धिंगत करण्याचा तो संकेत असतो. या काळात तुम्ही न्यू मुनमध्ये विचार केलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. जर तुम्ही सिंगल असाल तर डेटिंग अपच्या मदतीने जोडीदार शोधू शकता किंवा जोडीदार असेल तर तुमच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.

3) फर्स्ट क्वार्टर मून

फुल मून आणि न्यू मूनचा मधला काळ हा 'फर्स्ट क्वार्टर मून' असतो. या काळात तुमचे डेटिंग प्लॅन यशस्वी झालं आहेत की नाहीत याचा आढावा घेऊ शकता. लहान-लहान अडचणींतून मार्ग काढून तुम्ही नात्यांत पुढे जाऊ शकता. जर सर्व काही करून देखील नात्यांमध्ये सुधारणा होत नसेल तर ते तोडलेले उत्तम. त्यामुळे ज्यांना नात्यात संधी मिळाली आहे त्यांनी आपलं नातं घट्ट करण्यासाठी आणि जोडीदाराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा.

4) वॅक्सिंग गिबोस मून

पौर्णिमेच्या या काळात संपूर्ण चंद्र पाहायला मिळतो. या काळात चंद्राप्रमाणे तुमची सेक्स लाईफदेखील पूर्ण ऊर्जेने भरलेली असते. या काळात तुम्ही खूप उत्तेजित, जोशात आणि भावनिक असता. त्यामुळे हा काळ आनंदात घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

5) फूल मून

या काळात नात्यातील अनेक गोष्टी समोर येत जातात. या काळात तुमचं नातं उत्तम असेल तर तुम्ही जोडीदाराबरोबर सेक्स करण्याची आशा ठेवू शकता. तर सिंगल असलेल्यांनी काळात तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करावं. या दिवसात चंद्र आणि सूर्य एक दुसऱ्याच्या विरोधात असतात. त्यामुळे कोणतीही समस्या आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावं.

हे वाचा-चीअरलीडर्समुळे कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक विचलित होतो?सुरेश रैनाने केला हा खुलासा

6) वॅनिंग गिबोस मून

फूल मूननंतर वॅनिंग गिबोस मून हा काळ येतो. या काळात तुमच्या नात्यातील काही गोष्टी समोर येऊ शकतात. यामुळे या काळात कोणत्याही भावना आणि त्या समजावून सांगणं सोपे होईल. त्यामुळे तुमच्या पहिल्या डेटसाठी तुम्हाला न्यू मुनची वाट पाहावी लागणार आहे. तर तुम्ही नात्यात असाल तर तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.

7) शेवटचा क्वार्टर मून

या काळात चंद्र आकाराने लहान होत जातो. त्यामुळे या काळात तुमची ऊर्जा कमी होत जाते. या काळात तुम्ही तुमच्या नात्यामध्ये केलेल्या गोष्टींचा विचार करा आणि या काळात तुम्ही नातं तोडायचा विचार करत असल्यास हा योग्य काळ आहे. परंतु तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायला हवं.

8) वॅनिंग क्रिसेंट मून

हा काळ एकप्रकारे हायबरनेशन काळ असतो. या काळात न्यू मून पीरियडमध्ये काय करायचं आणि काय नाही याचा विचार करावा लागतो. यामध्ये मागील रिलेशनशिपमध्ये तुम्ही काय चूक केली आणि नव्या नात्यात ती टाळण्याचा विचार करायला हवा. त्याचबरोबर अनेक दिवस नात्यांत असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क कमी करण्याची देखील गरज आहे.

First published: November 21, 2020, 7:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या