Low cholesterol ही शरीरासाठी घातकच, 'या' अवयवावर होईल परिणाम

Low cholesterol ही शरीरासाठी घातकच, 'या' अवयवावर होईल परिणाम

high cholesterol जसं हृदयासाठी घातक तसं low cholesterol म्हणजे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी कमी असणं हे मेंदूसाठी घातक आहे.

  • Share this:

कोलेस्ट्रॉलचा (cholesterol) संबंध थेट हृदयाशी जोडला जातो. हाय कोलेस्ट्रॉल (high cholesterol) हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर हृदयावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलजची पातळी कमी ठेवा, असा सल्ला दिला जातो. मात्र high cholesterol जसं हृदयासाठी घातक तसं low cholesterol म्हणजे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी कमी असणं हे मेंदूसाठी घातक आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. lower cholesterol मुळे हॅमरेजिक स्ट्रोकचा (hemorrhagic stroke)धोका वाढतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे. hemorrhagic stroke म्हणजे मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होणे.

काय आहे संशोधन?

संशोधकांनी 96 हजार व्यक्तींचा अभ्यास केला. या व्यक्तींना कधीच हार्ट अटॅक आला नव्हता, त्यांना स्ट्रोक किंवा कॅन्सरही नव्हता.

संशोधनाच्या सुरुवातीला आणि त्यानंतर एका वर्षाने असे सलग 9 वर्षे या व्यक्तींच्या शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यात आली.

कोलेस्ट्रॉलची पातळी भरपूर कमी झाल्यासर स्ट्रोकचा धोका 169 टक्क्यांनी अधिक वाढतो, असं संशोधकांनात दिसून आलं.

शरीरातील कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित कराल?

अमेरिकामध्ये सर्वाधिक मृत्यूचं कारण हृदयासंबंधी आजार आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर भारतातही हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या कमी नाही. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे.आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडेफार बदल करून आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली तर शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहू शकते.

  1. आहारात मोसमी फळांचा (seasonal fruits) समावेश करा
  2. संत्री किंवा भाज्यांचा रस नियमित प्या
  3. ज्या पदार्थांमध्ये आवश्यक प्रमाणात कॅल्शिअम आहे, अशा पदार्थांचं सेवन करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2020 08:53 PM IST

ताज्या बातम्या