वजन कमी करायचं आहे? कमी कर्बोदकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

वजन कमी करायचं आहे? कमी कर्बोदकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

कर्बोदकांचे सेवन जर अधिक प्रमाणात केले तर शरीरातील कॅलरी वाढतात आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.

  • Last Updated: Jul 30, 2020 02:40 PM IST
  • Share this:

कुठल्याही प्रकारचा आहार घेताना त्यात कर्बोदकाचे प्रमाण कमी असायला हवे. कर्बोदके म्हणजेच कार्बोहाइड्रेट हे तीन पोषक पदार्थांपैकी एक आहेत. ते शरीरासाठी आवश्यक आहेतच पण त्याचा आहारातील समावेश योग्य प्रकारे करायला हवा. कारण त्याने शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांचे म्हणणे आहे की, कर्बोदकांचे सेवन जर अधिक प्रमाणात केले तर शरीरातील कॅलरी वाढतात आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. ज्यांना कायमचे वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यात कर्बोदकांचे प्रमाण कमी आहे. वजन कमी करण्याचे ध्येय समोर ठेवून कर्बोदकांचे प्रमाण कमी केल्याने शरीरातील इन्सुलिन हे हार्मोन्स कमी होण्यास मदत होते, जे शरीरात मेदाचे प्रमाण वाढवते आणि लठ्ठपणा येतो.

उत्तम प्रकारे वजन कमी करण्यासाठी कर्बोदके नसलेले किंवा कमी असलेले भोजन घ्यायला हवे. असे पदार्थ कोणते आहेत पाहुयात.

कोंबडी आणि मासे

कोंबडी आणि मासे हे कमी कर्बोदके असलेला आहार हवा असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहेत. myupchar.com च्या डॉ. नेहा सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे की, यातून प्रथिने मिळतात पण यात कर्बोदके कमी असतात. हे पदार्थ उकडून, भाजून किंवा शेकून खायला हवे.

दुधाची उत्पादने

कमी मेद असलेले दूध घेतल्याने प्रथिने मिळतात, त्यात कर्बोदक कमी प्रमाणात असतात. दह्याचा उपयोगही लस्सी, ताक किंवा साधे दही पण खाता येऊ शकते. यात पनीर पण खाल्ले तर चालेल. पनीर कमी तेलाची भाजी बनवून खाता येते किंवा बिना तेलाची पनीर टिक्की दही आणि मसाल्याबरोबर छान लागतात.

भाज्या

काकडी, ब्रोकोली, फुलकोबी यासारख्या भाज्या आपल्या फ्रिजमध्ये ठेवा, त्यात खूप कमी कर्बोदके असतात. बटाटे कमी खा, त्यात जास्त प्रमाणात कर्बोदके असतात.

फळे

नारळ, पपई, सफरचंद, पीच, आणि स्ट्रॉबेरी या फळांमध्ये कर्बोदके कमी असतात. कमी गोड असणाऱ्या फळांमध्ये कर्बोदके कमी असतात असे मानणे चुकीचे आहे. केळी आणि चिकू यात कर्बोदके जास्त प्रमाणात असतात, म्हणून ते कमी खायला हवेत.

शेंगदाणे आणि सुकामेवा

जर आपण वजन कमी करण्यासाठी आहाराचे नियोजन केले आहे आणि कर्बोदके कमी घेतल्याने भूक लागत असेल तर शेंगदाणे किंवा सुकामेवा खा. रोज मूठभर शेंगदाणे आणि सुकामेवा खाणे चांगली गोष्ट आहे. त्यात सूक्ष्म पोषक द्रव्ये, मेद, तंतुमय पदार्थ, प्रथिने असतात. ते भूकही भागवतात आणि पोट भरलेले राहते.

बिया

सब्जा, भोपळा, अळशी, सूर्यफुल यांच्या बिया खूप चांगल्या असतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम आणि मॅगनीजसोबत जीवनसत्व ए, बी, सी, ई आणि फॅटी अॅसिड असतात.

औषधी वनस्पती आणि मसाले

अशा अनेक औषधी वनस्पती आणि मसाले आहेत, ज्यात अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. वेलची, मिरची, मीठ, काळे मिरे, हळद, दालचिनी, मोहरी आणि इतर मसाले यांचा वापर आपण करू शकतो. कर्बोदके कमी असली तरी त्यांचा उपयोग स्वाद वाढवण्यासाठी होतो.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 30, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading