फेवरेट पदार्थ खाऊनही आता वाढणार नाही तुमचं वजन, ही आहेत कारण

फेवरेट पदार्थ खाऊनही आता वाढणार नाही तुमचं वजन, ही आहेत कारण

पाहूया असे कोणते पदार्थ आहेत जे खाण्याने तुमचं वजन वाढणार नाही आणि वाढतं वजन नियंत्रित करण्यास मदत होईल.

  • Share this:

चवदार खाद्यपदार्थ खाणं कोणाला आवडणार नाही? परंतु वाढत्या वजनामुळे लोक आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ शकत नाही. जर तुम्ही संतुलीत आणि पौष्टिक आहार घेत असाल तर वजन वाढणार नाही. कमी कॅलरी असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फॅट कमी प्रमाणात आढळून येतं. तर बघू या अशा कोणत्या गोष्टी खाण्याने पण तुमचं वजन वाढणार नाही आणि वाढतं वजन नियंत्रित करण्यास मदत होईल.

चिकन-

चिकन हा प्रोटिनचा स्रोत असल्यानं बाजारात पटकन मिळतं. तसंच तुम्ही तुमच्या चवीप्रमाणं चिकन वेगवेगळ्या पद्धतींनी बनवू शकता. चिकनमधून भरपूर प्रमाणात शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण खूप वेळ भूकही लागत नाही. असं असलं तरीही पचन शक्ती वाढण्यासाठी मदत होते आणि मेटाबॉलिजम नियंत्रित करुन शरीरातील साचलेल्या कॅलरीज कमी होतात.

उकडलेला बटाटा-

काही वेळा असं समजलं जातं की बटाटा खाण्यानं वजन वाढतं. परंतु असं काही नाही. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट बरोबरच शरीराकरता आवश्यक असे पोषक घटक आणि फायबरही असतात. जे तुमच्या शरीराच्या पचनक्रियेला संतुलीत ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला बटाट्याचे पदार्थ खायचेच असतील तर बटर किेंवा चीज यासारख्या गोष्टी बटाट्यासोबत न खाता ते पदार्ख नारळाच्या तेलात बनवल्यास वजन वाढत नाही.

फरसबी-

फरसबीही वजन कमी करण्यास उपयुक्त समजली जाते. संशोधन असं सांगते की फरसबीत असे काही घटक आहेत जे डायजेस्टिव हॉर्मोन दुप्पटीने वाढण्यास मदत करतात. याच बरोबर असं ही म्हटलं जातं की फरसबीमुळे रक्तातील साखर संतुलीत राहते. फरसबीला हाय फायबर डायट समजलं जातं ज्यानं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

सोया फूड-

सोया फूड प्रोटिनयुक्त असल्याने त्यांचा उपयोग फास्ट फूडमध्ये केला जातो. परंतू याचा उपयोग कमी कॅलरी आणि फॅट फ्री गोष्टींबरोबर खाल्यास ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. तसंच यात मोठ्या प्रमाणात अमायनो अॅसिड्स असल्याने वजन वाढत नाही आणि शरीरात जमा झालेल्या कॅलरीजही कमी होतात.

सफरचंद-

सफरचंदामध्ये फायबर असल्याने पोट भरण्याकरता कधी कधी मदत होते. तसंच असंही समजलं जातं की रोज सफरचंद खाल्याने रक्तातील साखर कमी होतेच आणि डॉक्टरांकडे जायचीही गरज पडत नाही.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:47 AM IST

ताज्या बातम्या