मुंबई, 03 मार्च: प्रत्येकालाचं आपण तरूण दिसावं असं वाटतं. आपलं वय जसजस वाढत जातं तस अनेकजणांना आपल्या वाढत्या वयामुळे कॉम्प्लेक्स येतो. मग आपलं वाढत वय लपण्यासाठी अनेक उपाय केले जातात. वयाची 35 वर्ष उलटून गेली की शरीरिरामध्ये वेगवेगळे बदल होतात. त्यानंतर आपण तरूणचं राहिलं पाहिजे असं वाटू लागतं.पण जर तुम्हाला तुमच वय लपवायचं असेल तर एका संशोधनातून एक उपाय समोर आला आहे.
तुमच्या रोजच्या जेवणात जर जास्त कॅलरीज असतील तर तुम्ही तुमच वय लपवू शकत नाही. तुम्हाला दीर्घकाळ तारुण्य अनुभवायचं असेल तर मग तुम्हाला कॅलरीजचा आहार कमी करावा लागेल.चीन आणि अमेरिकेनं केलेल्या रिसर्चमध्ये कमी कॅलरीजचा आहार घेतल्यास मानवी शरिरावर काय परिणाम होतो हे पाहिलं गेलं. कमी कॅलरीज आहार घेतल्यास तुमच वय वाढलं तरी तुम्ही तरूण दिसता. कॅलरीज कमी केल्यास तुमचं वय चेहऱ्यावर दिसून येतं नाही. जुआन कार्लोस या संशोकर्त्यानं सांगितलं आहे,‘आहारामध्ये कॅलरी कमी केल्यास तुमचं आयुष्य वाढतं. या रिसर्चमध्ये शरीरात होणारे सर्व बदलांचं निरिक्षण करण्यात आलं. सर्व आजारांचा तुम्हाला सामना करायचा असेल तर कॅलरीज कमी करा.’
कॅन्सर,मधुमेह यासारख्या गंभीर आजारांवर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही कॅलरीज कमी करण आवश्यक आहे. या रिसर्चमध्ये कॅलरीजच्या कमी वापरानंतरचा प्रभाव हा एका उंदरावर पाहिला गेला. यामध्ये या कॅलरी प्रतिबंध हा सगळ्या आजारांविरोधात प्रभावी असल्याचं पाहायला मिळालं.
रिसर्चमध्ये 30 टक्के कमी कॅलरीज खाणाऱ्या उंदराची तुलना सामान्य आहार खाणाऱ्याशी करण्यात आली आहे. या रिसर्चमध्ये 56 उंदरांवर 40 प्रकारचे वेगवेगळे विश्लेषण करण्यात आलं. रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी, तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी कॅलरीज नियंत्रणात ठेवण आवश्यक आहे. अनेकदा कॅलरीज कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. तुम्ही कोणत्याही गोळ्या घेऊन यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा आहारात अधिक कॅलरीज असलेले पदार्थ टाळले पाहिजेत.
इतर बातम्या:मोबाईलमध्येही घुसला कोरोना; 'या' मेसेजवर क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकारPeriods मध्ये चहा बिलकुल पिऊ नका, वेदना कमी होतील मात्र वाढतील इतर समस्या
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.