जाणून घ्या लो ब्लड प्रेशरची कारणं आणि लक्षणं

जाणून घ्या लो ब्लड प्रेशरची कारणं आणि लक्षणं

अनेकदा आपण शरीरात होणाऱ्या छोट्या- मोठ्या बदलांकडे सहज दुर्लक्ष करतो. आपला हाच निष्काळजीपणा नंतर महागात पडू शकतो.

  • Share this:

अनेकदा आपण शरीरात होणाऱ्या छोट्या- मोठ्या बदलांकडे सहज दुर्लक्ष करतो. आपला हाच निष्काळजीपणा नंतर महागात पडू शकतो. जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते, तेव्हा त्यावर त्वरीत उपचार  घेतले जातात. पण, जेव्हा कमी रक्तदाबाची समस्या येते तेव्हा बहुतांश वेळेला त्याची लक्षणंच कळत नाहीत. ही लक्षणं वेळीच ओळखली नाही तर भविष्यात आरोग्याशी निगडीत समस्या वाढू शकतात. आज आम्ही तुम्हाला लो ब्लड प्रेशरची लक्षणं काय असतात त्याबद्दल सांगणार आहोत...

कमी रक्तदाबाची लक्षणं- या रुग्णांना चक्कर येणं, मळमळणं आणि अस्पष्ट दिसणं यासारखी लक्षणं वारंवार दिसतात. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं वाजवीपेक्षा जास्त ताण घेता तर तुम्हाला लो ब्लड प्रेशर असू शकतो. तसेच तुमच्या हृदयाचे ठोके वेगवान होत असतील... त्वचा पिवळसर पडत असेल आणि शरीर थंड वाटट असेल तर ही सर्व लक्षणं फार गंभीर असून जीवावर बेतणारी आहेत. त्यामुळे वेळीच कमी रक्त दाबावर उपचार घेणं आवश्यक आहे.

घरगुती उपाय- अमर उजालामध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याचं एक कारण शरीरात मिठाची कमतरता हे असू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जेवणात मीठ जास्त खाल्लं पाहिजे. असं केल्याने रक्तदाब पूर्ववत होतो. यासोबतच दिवसभरात भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे चक्कर येत नाही.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

भर पावसात डेटवर जात असाल तर या गोष्टी एकदा वाचाच!

टॅटूमुळे पसरू शकतात का HIV, मलेरियासारखे जीवघेणे आजार, इथे घ्या जाणून

कुरळ्या केसांचा अभिमान कायम ठेवायचा असेल तर अशी घ्या केसांची काळजी!

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 10:54 AM IST

ताज्या बातम्या