Love Story : जेव्हा बाॅलिवूड हिराॅइनच्या प्रेमात पडले होते मंत्रिमहोदय

माॅस्कोमध्ये असताना हाॅटेलमध्ये दोघांच्या रुम्स शेजारी होत्या. रात्री दारूच्या नशेत ते विद्या सिन्हाची रूम ठोकत होते, अशीही चर्चा होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 12:22 AM IST

Love Story : जेव्हा बाॅलिवूड हिराॅइनच्या प्रेमात पडले होते मंत्रिमहोदय

मुंबई, 20 मार्च : आणीबाणीच्या काळातले माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला एक प्रतिनिधी मंडळ घेऊन माॅस्कोमध्ये गेले होते. त्यात बाॅलिवूडची त्या काळातली लोकप्रिय अभिनेत्री विद्या सिन्हा होती. माॅस्कोमधले त्यांच्या जवळकीबद्दलच्या चर्चा भारतात सुरू झाल्या होत्या.

असं म्हणतात, विद्याचरण शुक्ला यांनी विद्या सिन्हाला फोन करून रोमँटिक संवाद साधला होता. ते म्हणाले होते, तू पण विद्या, मी पण विद्या. यावर विद्या सिन्हा नाराजही झाली होती.

विद्या सिन्हा आणि विद्याचरण यांच्या रुम्स शेजारी

माॅस्कोमध्ये असताना हाॅटेलमध्ये दोघांच्या रुम्स शेजारी होत्या. रात्री दारूच्या नशेत ते विद्या सिन्हाची रूम ठोकत होते, अशीही चर्चा होती.

विद्या सिन्हा आणि संजीव कुमारचा रोमान्स

Loading...

त्यावेळी विद्या सिन्हाचा रजनीगंधा आणि छोटीसी बात सारखे सिनेमे हिट झाले होते. संजीव कुमारसोबत तिनं खूप सिनेमे केले. त्या दोघांच्या रोमान्सचीही चर्चा होती.

विद्याचे वडील निर्माता होते. सिनेमात येण्याआधी विद्याचं लग्न झालं होतं. तिच्या शेजारी राहणाऱ्या दक्षिण भारतीय अय्यर कुटुंबातल्या मुलाच्या ती प्रेमात पडली. नंतर लग्न केलं. 18व्या वर्षी 'मिस बाॅम्बे' बनली. तिच्या पतीला तिनं सिनेमात काम केलेलं आवडत नव्हतं. पती आजारी पडला. 1996मध्ये त्याचं निधन झालं. मग विद्या दत्तक घेतलेल्या मुलीला घेऊन आॅस्ट्रेलियाला गेली.


विद्याचं प्रेम, दुसरं लग्न आणि घटस्फोट

विद्या आणि आॅस्ट्रेलियात राहणारा भारतीय डाॅक्टर नेताजी भीमराव साळुंका प्रेमात पडले. दोघांनी लग्नही केलं. पण लग्न टिकलं नाही. विद्या बाॅलिवूडची बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. ती दिल्लीत यायची, तेव्हा तिच्यासाठी हाॅटेलमध्ये रूम बुक केलेली असायची.

मध्य प्रदेशचं वर्तमानपत्र देशबंधूचे मुख्य संपादक ललित सुरजन म्हणतात, विद्याचरण आणि विद्या सिन्हा यांचं अफेअर होतं, असं मला वाटत नाही. छत्तीसगढमध्ये तरी याबद्दल काही ऐकिवात नव्हतं.'

विद्याचरण शुक्लांच्या घरी पाळले होते दोन वाघ

विद्याचरण शुक्ला यांनी अनेक अप्रिय निर्णय घेतले होते. ते संजय गांधींच्या चौकटीतले समजले जायचे. ते राजेशाही थाटात जगायचे. त्यांचा थाटमाट मोठा असायचा. त्यांनी घरी वाघाचे बछडे पाळले होते. नंतर त्यांना प्राणी संग्रहालयात सोडलं होतं.

विद्याचरण शुक्ला यांना तीन मुली होत्या. त्यातली एक वारली. दोघी अमेरिकेत राहतात. रायपूरचा त्यांचा बंगला आता रिकामा असतो. त्यांनी अनेक पक्ष बदलले. त्यामुळे प्रतिष्ठा मिळाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...