Love Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप

Love Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप

विराट-अनुष्काचं भेटणं, पुन्हा दुरावा येणं आणि शेवटी एक होणं हे एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय. इटलीत दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. त्या दोघांचं भेटणं, पुन्हा दुरावा येणं आणि शेवटी एक होणं हे एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे.

31 डिसेंबर 2013ची ती रात्र. मुंबईत नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू होता. भारतीय टीम 25 दिवसांनी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परत येत होती. विमानतळाबाहेर लक्झरी बस खेळाडूंची वाट पहात होते. सगळे त्यात बसले फक्त एक सोडून. तो होता विराट कोहली.

सगळ्यांचा निरोप घेऊन विराट कुणाची तरी वाट पहात होता. थोड्याच वेळात एक BMW आली. त्यात बसून विराट वर्सोव्याला निघून गेला. विमानतळावर विराटचे फोटो घेणाऱ्या मीडियाला समजलं की ती कार कोणाची होती.

होय, ती कार होती अनुष्का शर्माची. त्या काळात दोघांच्या मैत्रीची खूप चर्चा होती. कारच्या मागून काही उत्साही कॅमेरामनही निघाले. कार वर्सोव्यात अंबरनाथ टाॅवरमध्ये गेली. इथेच अनुष्काचा डुप्लेक्स फ्लॅट आहे. कॅमेरामन रात्रभर बाहेर वाट पहात होता. कधी दोघं बाहेर येऊन नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जातील. पण दोघं बाहेर आलेच नाहीत. त्यांचं सेलिब्रेशन फ्लॅटमध्येच झालं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांच्या मुख्य पानावर विराटचा अनुष्काच्या कारमध्ये बसतानाचा फोटो होता.

दोघांची जवळीक

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी विराट अनुष्कासोबत होता. दोघांना एकत्र अनुष्काच्या घरच्या पार्किंगमध्ये पाहिलं होतं. तिथूनच तो दौऱ्यावर निघाला.

त्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाताना विराट अनुष्काच्या फ्लॅटवर राहिला होता. अनुष्काही न्यूझीलंडला गेली होती. दोघांचे तिथे एकत्र फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

पहिली मुलाखत

विराट आणि अनुष्काची मुलाखत 2013मध्ये शॅम्पूच्या शूटिंगला झाली. दोघांमध्ये मैत्री वाढली. दोघं जास्त एकत्र दिसायला लागले. मुलाखतीत अनुष्का आम्ही चांगले मित्र आहोत सांगायला लागली.

अनुष्कानं सांगितलं, मला सुरुवातीला विराट खूप उद्धट वाटला होता. म्हणून मीही त्याच्याशी तसंच वागायचे. पण तो दिलखुलास आणि बुद्धिमान आहे.


दोघांमध्ये प्रेमाची सुरुवात झाली. हृदयं एकमेकांसाठी धडकायला लागली होती. एकमेकांना भेटायला ते एकही संधी सोडायचे नाहीत. अनुष्काचा 26वा वाढदिवस साजरा करायला विराट उदयपूरला पोचला. तिथे अनुष्का सिनेमाचं शूटिंग करत होती.

नोव्हेंबर 2014मध्ये विराट श्रीलंकेला खेळत होता. विराटनं शतक ठोकलं. व्हीआयपीमध्ये अनुष्का होती. विराटनं बॅट तिच्याकडे उंचावून  फ्लाइंग किस दिला.

नंतरच्या प्रत्येक इव्हेंटला दोघं रिलेशनशिपबद्दल काही विचारलं तर सगळं ओपन आहे म्हणायचे.

ब्रेकअपच्या बातम्या

दोघांमध्ये आलेला दुरावा सोशल मीडियावर फॅन्सना जाणवायला लागला. दोघांनी इन्स्टावर एकमेकांना अनफाॅलो केलं. सुलतानच्या पार्टीला सलमाननं विराटलाही बोलावलं होतं. पण तिथेही दोघांमधला दुरावा नजरेत आला. असं म्हणतात विराट पझेसिव्ह असल्यानं हा दुरावा आला.

दुराव्याचं कारण पैसा होता का?

अनुष्काचा बाँबे वेलवेटमध्ये विराटनं पैसा गुंतवला होता. तो सिनेमा आपटला. त्यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. विराट पैशाच्या नुकसानीवर काही बोलला, अनुष्का चिडली. आता नातं तुटतेय असं वाटताना 2016मध्ये ते  पुन्हा एकत्र आले.


या ब्रेकअपचा परिणाम विराटच्या खेळावर झाला. लोकांनी अनुष्काला जबाबदार धरून ट्रोल केलं. तेव्हा विराटच तिच्या बाजूनं उभा राहिला. सगळ्यांना म्हणाला शेम.

सगळ्यांना दोघांनी एकत्र यावं असं वाटत होतं. विराट अनुष्काला मनवायला यशस्वी झाला. 2017मध्ये व्हॅलेंटाइन्स डेला विराटनं अनुष्का माझ्या आयुष्यात असली तर रोजचा दिवस व्हॅलेंटाइन आहे म्हटलं.

शेवट गोड झाला. दोघांचं धूमधडाक्यात लग्न झालं. आजही दोघांची जोडी पाहिली तर एकमेकांच्या नजरेत एकमेकांविषयी प्रेमच दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या