News18 Lokmat

Love Story : या काँग्रेस अध्यक्षांच्या लग्नाला गांधीजींनी केला होता कडाडून विरोध

ते होते काँग्रेसचे अध्यक्ष. स्वातंत्र्य लढ्यातलं मोठं नाव. ते त्यांच्याहून 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडले. एक बंगाली आणि एक सिंधी.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 08:50 PM IST

Love Story : या काँग्रेस अध्यक्षांच्या लग्नाला गांधीजींनी केला होता कडाडून विरोध

मुंबई, 09 एप्रिल : ते होते काँग्रेसचे अध्यक्ष. स्वातंत्र्य लढ्यातलं मोठं नाव. ते त्यांच्याहून 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडले. एक बंगाली आणि एक सिंधी. प्रेमाचा रंग इतका गहरा की दोघंही एकमेकांवाचून राहूच शकत नव्हते. कितीही विरोध असला तरीही.

आम्ही सांगतोय जेबी कृपलानी आणि सुचेता मुजुमदार यांच्याबद्दल. दोघंही खूप जिद्दी होते. त्यांची पहिली भेट कुठे झाली ते सांगणं कठीण. पण बनारस हिंदू विश्वविद्यालयमध्ये त्यांच्या प्रेमाचा पाया रचला गेला. नंतर गांधीजींसाठी काम करताना दोघं जवळ आले.

लग्न शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हता

कृपलानी कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना कामात मग्न राहायला आवडायचं. स्त्रियांना तसे ते दूरच ठेवायचे. स्वातंत्र्याआधी ते बराच काळ काँग्रेसचे महासचिव होते. नंतर स्वातंत्र्यानंतर ते अध्यक्ष बनले. पण नंतर परिस्थिती बदलली. ते काँग्रेसच्या विरोधात गेले तर सुचेता काँग्रेसमध्ये मंत्री आणि मुख्यमंत्रीही बनल्या.

बीएचयूमध्ये प्रेमाचा रंग चढला

Loading...

कृपलानी बीएचयूमध्ये इतिहासाचे प्रोफेसर बनले. ते तिथे एकच वर्ष होते. पण वर्षभरात त्यांनी आपला चांगलाच प्रभाव सोडला होता. ते कधी बनारसला जात तेव्हा बीएचयूच्या इतिहास विभागाला भेट देत. त्याच वेळी त्यांची भेट सुचेताशी झाली. या बंगाली तरुणीला पाहून कृपलानी प्रभावित झाले. दोघांमध्ये बंध निर्माण होऊ लागला.

प्रेमाची चाहुल

सुचेता यांना गांधी आंदोलनात सहभागी व्हायचं होतं. त्यावेळी कृपलानी त्यांचे मार्गदर्शक बनले. दोघं एकत्र काम करताना जास्त जवळ आले.

लग्नाला घरून विरोध

घरच्यांना सुचेता पसंत नव्हत्या. त्यांनी कडाडून विरोध केला.

गांधीजींचा विरोध

गांधीजींनी लग्नाला विरोध केला होता, असं सुचेता यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. गांधीजींनी कृपलानींना सांगितलं की तुम्ही लग्न केलंत तर माझा उजवा हात तोडून न्याल. या लग्नामुळे सुचेता यांचं चळवळीकडे दुर्लक्ष होईल, असं गांधीजींचं म्हणणं होतं. पण सुचेतांनी सांगितलं, उलट लग्नानंतर तुम्हाला अजून एक व्यक्ती आंदोलनासाठी मिळेल.

गांधीजींनी सुचेतांसाठी आणलं स्थळ

गांधीजींना सुचेतांनी दुसऱ्याशी लग्न करावं असं वाटायचं. पण सुचेता यांनी विरोध केला. आपलं म्हणणं पटवून दिलं. नेहरूंनीही गांधीजींना समजावलं. गांधीजींचा विरोध मावळला.

कृपलानी 48 वर्षांचे आणि सुचेता 28च्या

1936मध्ये गांधीजींनी दोघांना बोलावलं. म्हणाले मी या लग्नाला आशीर्वाद नाही देणार. पण प्रार्थना करेन. एप्रिल 1936मध्ये सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचं लग्न झालं.

लोकसभेत दोघंही एकमेकांविरोधात

कृपलानी म्हणायचे काँग्रेस बदमाश आहे की माझी पत्नीही पळवून घेऊन गेले. कृपलानी काँग्रेस विरोधात होते. सुचेता स्वातंत्र्यलढ्यातल्या तीन उच्चशिक्षित बंगाली महिलांपैकी एक होत्या. त्यांनी उत्तर प्रदेशाला आपलं कार्यक्षेत्र बनवलं.

स्वातंत्र्यानंतर कृपलानी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी कामगार पक्ष काढला. सुचेता या पक्षातर्फे दिल्लीत निवडून आल्या. पण नंतर त्या काँग्रेसमध्ये गेल्या. उत्तर प्रदेशच्या मुख्समंत्रीही बनल्या.

पत्नीची भूमिका पार पाडली

1971मध्ये राजकारणातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्या कृपलानींसोबत दिल्लीत राहिल्या. पतीची देखभाल केली. 1974मध्ये सुचेता 66 वर्षांच्या असताना त्यांचं निधन झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: love story
First Published: Apr 9, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...