Love Story : ...म्हणून संजय गांधींच्या लग्नाबद्दल सगळ्या देशाला होती उत्सुकता

Love Story : ...म्हणून संजय गांधींच्या लग्नाबद्दल सगळ्या देशाला होती उत्सुकता

विनोद मेहता आपल्या द संजय स्टोरी या पुस्तकात लिहितात की मनेका यांनी एका टाॅवेलची बोल्ड जाहिरातही केली होती. दिल्लीत सगळीकडे होर्डिंग्ज लागले होते.

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : 29 जुलै 1974 रोजी पंतप्रधानांच्या बंगल्यातून एक छोटी घोषणा केली गेली. पंतप्रधानांच्या धाकट्या मुलाच्या साखरपुड्याची. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी यांचा साखरपुडा मनेका गांधींशी झाला. सफदरजंग रोडवर छोट्या कार्यक्रमात साखरपुडा झाला. बातमी पसरली तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता होती पंतप्रधानांचा मुलगा कोणाशी लग्न करतोय?

वर्तमानपत्रांसाठी जी माहिती प्रसिद्ध केली होती ती अशी होती, मनेका जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. त्या दिल्ली डेटलाइन या साप्ताहिकाच्या पत्रकार आहेत. मनेका अगोदरच प्रसिद्ध झाल्या होत्या. 1973मध्ये त्या दिल्लीच्या लेडी श्रीराम काॅलेजमध्ये मिस लेडीही झाल्या होत्या. त्यांच्याकडे माॅडेलिंगच्या आॅफर्सही यायला लागल्या होत्या.

विनोद मेहता आपल्या द संजय स्टोरी या पुस्तकात लिहितात की मनेका यांनी एका टाॅवेलची बोल्ड जाहिरातही केली होती. दिल्लीत सगळीकडे होर्डिंग्ज लागले होते.

28 जुलैला ही जाहिरात करणाऱ्या एजन्सीकडे श्रीमती आनंद म्हणजे मनेका यांच्या आईचा फोन आला. त्यांनी ताबडतोब ती होर्डिंग्ज काढून टाकायला सांगितली होती. मनेकाचे सर्व फोटो परत द्यायलाही सांगितले. पंतप्रधान कार्यालयातून तसा आदेश आला होता.

भेटले आणि प्रेम फुललं

फ्री प्रेस जर्नलमध्ये सोनाली पिंपुतकरनं लिहिलं, ती जाहिरात पाहूनच संजय गांधी मोहित झाले. ते मनेका यांचा कझिन विनू कपूर यांचा मित्र होता. विनू यांच्या लग्नाच्या काॅकटेल पार्टीत संजय आणि मनेका यांची भेट झाली.

1973मध्ये ते भेटले. तेव्हा मनेका 17 वर्षांच्या होत्या. मग ते भेटतंच राहिले. दरम्यान संजय गांधींचं हार्नियाचं आॅपरेशन झालं. तेव्हा मनेका त्यांना भेटायला रोज हाॅस्पिटलमध्ये जात होत्या.

संजय गांधींनी मनेका यांना घातली मागणी

विनोद मेहतांनी द संजय स्टोरी या पुस्तकात लिहिलंय, संजय गांधींनी कर्नल आनंद यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी काही हरकत नाही. पण अगोदर त्यांनी त्यांच्या आईचा होकार आणावा.

या पुस्तकात लिहिलंय, जेव्हा इंदिरा गांधींना कळलं की त्यांच्या मुलगा लग्न करतोय, तेव्हा त्यांना बरं वाटलं. पण मनेका त्यांच्यासाठी किती योग्य आहे, ते त्यांना कळेना. त्यांनी मनेका यांना बोलावलं. मनेका यांच्याशी गंभीरपणे त्या बोलल्या. एक तर त्यांनी सांगितलं, संजयसोबत राहणं सोपं नाही. दुसरं म्हणजे दोघांच्या वयातलं 10 वर्षांचं अंतरही त्यांना चिंताजनक वाटत होतं.

यावर मनेका गांधी उद्गारल्या, त्यांना या गोष्टी माहीत आहेत.

साधेपणानं लग्न

29 सप्टेंबर 1974 रोजी दोघांचं लग्न अगदी साधेपणानं झालं.  गांधी कुटुंबाचे मित्र मोहम्मद युनुस यांच्या घरी हे लग्न झालं. कुटुंबातले सर्वजण उपस्थित होते. प्रेसला दूरच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी हनिमूनला न जाता मनेका गांधी जर्मन क्लासला गेल्या, तर संजय गांधी कार फॅक्टरीत.

हे लग्न चांगलं टिकलं. काही जणांचा अंदाज होता की हे लग्न वर्षभरही टिकणार नाही, पण तसं काही झालं नाही. 1980मध्ये विमान दुर्घटनेत संजय गांधींचा मृत्यू झाला. त्यावेळी वरूण फक्त 3 महिन्यांचा होता. काही दिवसांनी मनेका आणि इंदिरा गांधींच्या भांडणाच्या बातम्या यायला लागल्या.

खुशवंत सिंग यांनी त्यांच्या अॅब्स्युल्युट खुशवंत पुस्तकात लिहिलंय की मनेका गांधी आणि इंदिरा गांधी यांचं भांडण विकोपाला गेलं. मनेकांनी त्यांचं घर सोडलं आणि स्वत:चं घर घेतलं. स्वत:चं घरंच नाही तर स्थानही बनवलं.

संजय गांधींची दुसरी मुलगी होती?

जेव्हा मधुर भंडारकरनं इंदू सरकार सिनेमा तयार केला तेव्हा प्रिया सिंह पाॅल नावाच्या महिलेनं तो सिनेमा रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात धाव घेतली होती. प्रिया सिंह म्हणत होती की ती संजय गांधींची मुलगी आहे. तिचा जन्म 1968ला झाला. इंदिरा गांधींना हे माहीत होतं. पुढे एका श्रीमंत घरात तिला दत्तक दिलं गेलं. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व प्रसिद्धीसाठी केलंय.

संजय गांधी, आणीबाणी आणि रुखसाना सुल्तान

आणीबाणीच्या काळात संजय गांधींची खूप चर्चा असायची. त्यावेळी रुखसाना सुल्तानबरोबरच्या संबंधांबद्दल चर्चा असायची. रुखसाना सुंदर आणि माॅडर्न स्त्री होती. दिल्लीचे प्रसिद्ध बिल्डर विक्रम सिंहच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्न केलं. त्यांना मुलगी झाली. ती आजची अभिनेत्री अमृता सिंग. त्यांचा नंतर घटस्फोट झाला. रुखसाना बुटिक चालवायला लागली.

वरिष्ठ पत्रकार राजेश रपरियांना मात्र संजय गांधी आणि रुखसाना यांच्यात काही संबंध नव्हता असं ठाम वाटतं.

अतिशय दुर्दैवी मृत्यू

संजय गांधींनी 21 जून 1980रोजी नव्या विमानाचं स्वत: उड्डाण केलं होतं. सोबत मनेका, इंदिरा गांधींचे विशेष सहाय्यक आर के धवन आणि धीरेंद्र ब्रम्हचारी होते. 40 मिनिटं दिल्लीवर विमान चालवत होते. 23 जूनला तेच विमान घेऊन इंस्ट्रक्टर सुभाष सक्सेनासोबत त्यांनी उड्डाण केलं. 7 वाजून 58 मिनिटं झालेली. विमानानं उड्डा, पण केलं. पण आकाशात इंजिन बंद पडलं. विमान खाली कोसळलं. लोकांनी दोघांना घेऊन राम मनोहर लोहिया हाॅस्पिटल गाठलं, पण दोघांना मृत घोषित केलं.

- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

First published: April 4, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading