Valentine's Day : वेगवेगळे राहात होते इंदिरा गांधी-फिरोज , तरीही नाही घेतला घटस्फोट

Valentine's Day : वेगवेगळे राहात होते इंदिरा गांधी-फिरोज , तरीही नाही घेतला घटस्फोट

फिरोज गांधींनी इंदिरा गांधींकडे घटस्फोट मागितला, तेव्हा त्या तो द्यायला तयार होत्या. पण फिरोज यांनी ठेवलेली अट ऐकून त्या भडकल्या.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : फिरोज गांधींचा उत्तर प्रदेश सरकारमधल्या एका मुस्लिम मंत्र्याच्या मुलीसोबत रोमान्स सुरू होता. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. तेव्हा फिरोज गांधी यांनी आपल्या पत्नी इंदिरा गांधीकडे घटस्फोट मागितला. दोघांचं नातं तुटलंच होतं. त्यामुळे इंदिरा गांधी म्हणाल्या, घ्या घटस्फोट. माझी हरकत नाही. पण फिरोज यांनी इंदिरा गांधींसमोर जी काही अट ठेवली त्यानं इंदिरा गांधी भडकल्या. त्यांनी घटस्फोटाला नकारच दिला.

असं म्हणतात फिरोज यांचं प्रेमप्रकरण चाललं होतं, ती आॅल इंडिया रेडिओवर काम करत होती. उत्तर प्रदेशच्या प्रसिद्ध मुस्लिम कुटुंबातली ती होती. फिरोजनं इंदिरा गांधीजवळ घटस्फोट मागितला तेव्हा मोठ्या मुलाची कस्टडीही मागितली होती. म्हणूनच इंदिरा गांधींनी घटस्फोट द्यायला नकार दिला.

प्ले बॉय फिरोज

एम.ओ.मथाई यांचं पुस्तक "रेमनिसन्सिज ऑफ द नेहरू एज" या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. या पुस्तकात मुलीचं नाव नाही. पण नंतर माहिती काढली तर कळलं तिचं नाव महमुना सुल्तान होतं. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे या रोमँटिक नात्याबद्दल लखनऊच्या मुस्लिम मंत्र्यांपर्यंत पोचल्यावर ते ताबडतोब दिल्लीत आलेय मुलीला दिल्लीतून घेऊन गेले.  फिरोज 50च्या दशकात भारतीय राजकारणातले प्ले बाॅय होते. कॅथरीन फ्रँक यांच्या "इंदिराः द लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी" पुस्तकात फिरोज हे बिनधास्त आयुष्य जगणारे होते, खाणं-पिणं आणि सेक्स बेसुमार चालायचा. या पुस्तकाप्रमाणे इंदिरा गांधींसोबत लग्न झाल्यानंतरही ते दुसऱ्या महिलांशी फ्लर्ट करायचे. महमुना सुल्तानव्यतिरिक्त लोकसभेतली ग्लॅमर गर्ल म्हणून ओळख असलेल्या तारकेश्वर सिन्हा, सुभद्रा जोशी यांच्यासोबतही त्यांचे संबंध होते. एक सुंदर नेपाळी महिलाही त्यांची गर्लफ्रेंड होती. ती घटस्फोटित होती. ती आॅल इंडिया रेडिओवर काम करायची. तिचं सासर केरळचं मोठे आसामी होते.

फ्रँकनं इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्यामध्ये आलेल्या संकटांबद्दलही लिहिलंय. फिरोज यांनी इंदिरा गांधींनी त्यांच्या 16व्या वाढदिवशी प्रपोझ केलं होतं. इंदिरा गांधींनी नकार दिला होता. कमला नेहरूंचाही या नात्याला कडाडून विरोध होता. फ्रँक यांच्या पुस्तकात म्हटलंय, त्याकाळी दोघांच्या रिलेशनबद्दल खूप चर्चा होती.  कमला यांनी या लग्नाला विरोध करत म्हटलं होतं, इंदिरानं जर हे लग्न केलं तर ती तिच्या आयुष्यातली मोठी चूक ठरेल.

कमला नेहरूंचा लग्नाला विरोध

फिरोज गांधी यांच्या आत्मचरित्रावरून कळतं की, फिरोज मुंबईच्या एका पारसी फेरदून जहांगीर घेंदीचे मुलगा होते. ते मरीन इंजिनियर होते. पण एम.ओ.मथाई यांच्या पुस्तकात वेगळंच म्हटलंय. त्यात लिहिलंय, फिरोजचे वडील इलाहाबादमध्ये दारूचं दुकान चालवायचे. नेहरू कुटुंबासमोर त्यांची काहीच योग्यता नव्हती. फिरोज यांना कमला नेहरूंच्या मदतीसाठी नियुक्त केलं होतं. मथाई म्हणतात, फिरोज जास्त शिकले नव्हते. जेव्हा इंदिरा गांधी ब्रिटनला होत्या तेव्हा ते त्यांच्या जवळ जाण्यासाठी लंडनला पोचले. त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्समध्ये अॅडमिशन घेतली होती. पण त्यांचं शिक्षण हा विनोदाचा विषय ठरलं होतं.

कमला यांच्या नजरेतून फिरोज

"रेमनिसन्सिज ऑफ द नेहरू एज"मध्ये लिहिलंय, कमला जर्मनीत उपचारासाठी होत्या. त्यांच्या खोलीत नेहरू आणि एसीएन नांबियार होते. त्यानंतर दोन महिन्यांनी कमला यांचं लग्न झालं. त्यावेळी कमला म्हणाल्या की त्यांना इंदिरा गांधींच्या भविष्याची चिंता वाटते. फिरोजसोबत इंदिरा गांधींच्या लग्नाला त्यांचा विरोध होता. त्या फिरोज यांना चंचल म्हणायच्या. इंदिरा यांची ते जबाबदारी उचलू शकणार नाहीत. कमला खूप इमोशनल झाल्या. त्या म्हणाल्या, माझी मुलगी आयुष्यभर दु:खी राहावी असं मला नाही वाटत. तेव्हा नेहरू म्हणाले, ही गोष्ट तू माझ्यालर सोड.

त्यानंतर कमला नांबियार यांना म्हणाल्या, ' तुम्ही ऐकलं का त्यांनी काय म्हटलं ते. पण इंदू माझ्याशिवाय कुणाचंच ऐकणार नाही. आतापर्यंत मी तिला फिरोजपासून दूर ठेवू शकले. पण मी आता खूप दिवस जगणार नाही. जवाहर तिला गाईड नाही करू शकणार. शेवटी ते तिला आयुष्यात चूक करायला परवानगी देणारच.'

नेहरूंचाही विरोध

कमला यांच्या निधनानंतर इंदिरा एकटी पडली. त्यांना मानसिक आधाराची गरज होती. वडील नेहरू कामात व्यग्र असायचे. बऱ्याचदा बाहेरच असायचे. त्यांना फिरोजनी मानसिक आधार दिला. दोघांमधली जवळीक वाढली. असं म्हणतात दोघांनी गुप्त विवाह केला. नेहरू आणि त्यांचं कुटुंब या लग्नाच्या विरोधात होतं. मथाई यांच्या पुस्तकात म्हटलंय, पद्मजा नायडूंनी नेहरूंना सांगितलं, त्यांची मुलगी आता मोठी झालीय. दोघांना लग्न करायचं असेल तर तुम्ही विरोध करू शकत नाही. परवानगी द्यायला हवी. तेव्हा कुठे अनिच्छेनं नेहरूंनी या लग्नाला परवानगी दिली.

विजय लक्ष्मी पंडित यांच्या मुलीच्या प्रेमात

इंदिरा गांधींशी लग्न झाल्यानंतर फिरोज यांना नॅशनल हेराल्ड, नवजीवन आणि कौमीआवाज यांना प्रकाशित करणारी कंपनी असोसिटेड जर्नल्स लिमिटेडचे मॅनॅजिंग डायरेक्टर केलं. 1951-52च्या लोकसभा निवडणुकीत फिरोज प्रतापगढहून निवडले गेले.  त्यानंतर 1961मध्ये त्यांचं निधन होईपर्यंत ते खासदार होते. 1956मध्ये त्यांनी रायबरेलीतूनही निवडणूक लढवली होती. मथाई यांच्या म्हणण्याप्रमाणे 1947मध्ये फिरोज विजय लक्ष्मी पंडित यांच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. ती लखनऊच्या नॅशनल हेराल्डमध्ये पत्रकार होत्या. पंडित यांना ही गोष्ट कळल्या कळल्या ते स्वत: माॅस्कोवरून विमानानं आल्या आणि मुलीला घेऊन माॅस्कोला गेल्या.

लग्नानंतर काही दिवसांनी नात्यात दुरावा

इंदिरा गांधी आणि फिरोज यांच्या नात्यात लग्नानंतर काही दिवसांनी दुरावा यायला सुरुवात झाली. काही वर्षांनी इंदिरा आपल्या मुलांना घेऊन वडिलांकडे आल्या. अनेकदा दोघांमध्ये समेटही झाला. फिरोज काही दिवस इंदिरा गांधींसोबत प्रधानमंत्री हाऊसमध्ये राहिले. पण नंतर ते वेगळेच झले. मथाई यांनी लिहिलंय, इंदिरा आणि फिरोज दोन वेगवेगळी आयुष्य जगत होते. कॅथरीन फ्रँक आणि मथाई दोघांनीही लिहिलंय, फिरोज अनेकदा खासदारांमध्ये बोलताना मथाई यांना नेहरूंचा जावई म्हणायचे. फिरोज स्वत:च्याच सरकारविरोधात कारवाया करायचे.

इंदिरा तेव्हा गरोदर होत्या

पुपुल जयकर यांच्या म्हणण्याप्रमाणे इंदिरा जेव्हा फिरोजच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. त्यांना लग्न करून साधं आयुष्य जगायचं होतं. पण फिरोजसोबत भांडणं सुरू झाल्यावरच त्यांनी राजकारणात रस घेणं सुरू केलं. इंदिरा गांधी दुसऱ्या मुलाच्या वेळी गरोदर होत्या तेव्हा त्यांना फिरोज यांच्या अफेअर्सबद्दल कळलं.

फिरोज यांचं निधन

1958मध्ये फिरोज यांना हार्ट अॅटॅक आला. इंदिरा गांधी त्यांची सेवा करायला गेल्या. पण तरीही दोघांमध्ये वाद सुरू होते. मग दोघांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण 1961मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

First published: February 13, 2019, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading