Love Story : या 'ड्रीम कपल'मधलं प्रेमच संपून गेलं

Love Story : या 'ड्रीम कपल'मधलं प्रेमच संपून गेलं

त्यांची लव्ह स्टोरी लग्नात रुपांतरित झाली. ते ड्रीम कपल झाले. पण लवकरच या लव्ह स्टोरीनं वेगळं वळण घेतलं. घटस्फोटासाठी त्यांना कोर्टात जावं लागलं.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : मुंबईच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये 24 वर्षांपूर्वी मार्केटिंग विभागात एका तरुण आणि तरुणीची भेट झाली. दोघंही खूप सुंदर. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांची लव्ह स्टोरी लग्नात रुपांतरित झाली. ते ड्रीम कपल झाले. पण लवकरच या लव्ह स्टोरीनं वेगळं वळण घेतलं. घटस्फोटासाठी त्यांना कोर्टात जावं लागलं.

ही कथा आहे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची. 1994मध्ये उन्हाळ्यात मुंबईच्या ओबेराॅय हाॅटेलमध्ये लंडनहून शिकून आलेल्या तरुणीनं मार्केटिंगमध्ये नोकरी सुरू केली होती. तिचं नाव पायल नाथ. त्याच वेळी एका तरुणानं याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी सुरू केली. हा तरुण 5 फूट 9 इंच उंच. वय होतं 24 वर्ष. कोणालाही आकर्षण वाटेल असा होता. दोघंही देखणे आणि सुंदर होते.

दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी

पायलचा जन्म दिल्लीचा. वडील भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. आर्मी स्कूलमध्ये सुरुवातीला शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. ओमर यांचा जन्म ब्रिटनचा. जम्मू काश्मीरमध्ये त्यांचं कुटुंब प्रसिद्ध. शेख अब्दुल्लांचं हे कुटुंब. ओमर यांचं सुरुवातीला शिक्षण झालं श्रीनगरमध्ये. नंतर मुंबईच्या सिडनहॅम काॅलेजमध्ये बीकाॅमपर्यंत शिक्षण घेतलं. ओमर यांच्या इंग्लिश आईला मुलानं राजकारणात जावं हे मान्य नव्हतं. त्यांचे वडील फारुक अब्दुल्लांनीही त्यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

मैत्री आणि प्रेमात आल्या अडचणी

मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण लग्नाला ओमर यांच्या घरून खूप विरोध झाला. ओमर मुस्लीम आणि पायल शीख होती. फारुख अब्दुल्लांना काश्मिरी सून हवी होती. ओमर यांच्या आईचाही विरोध होता.

शेवटी झालं लग्न

1 सप्टेंबर 1994 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघं हाॅटेलमध्येच नोकरी करत होते. लग्नानंतर पायलनं नोकरी सोडली. काही दिवसांनी ओमर यांनीही नोकरी बदलली. ते आयटीसी ग्लोबल होल्डिंगमध्ये नोकरी करू लागले. आयुष्य छान चाललेलं. दोघांना जमीर आणि जाहिर ही दोन मुलंही झाली. वेळ जणू पंख लावल्याप्रमाणे उडत होता.

ओमर राजकारणात आले

त्यांना अगोदर राजकारणात रस नव्हता तेच ओमर 1999मध्ये लोकसभेसाठी निवडले गेले. मंत्री झाले. त्यावेळी पायल अब्दुल्ला मात्र पडद्यामागे असायच्या. 2009मध्ये ओमर पहिल्यांदा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी पायल त्यांच्या सोबत सार्वजनिक मंचावर दिसू लागल्या.

सुरू झाले वाद

त्याच वेळी दोघांमध्ये वाद, भांडणं सुरू झाली. 2009पासून पायल मुलांना घेऊन दिल्लीत राहायला लागल्या. असं म्हणतात ओमर एका अँकरच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे हा दुरावा वाढला.

घटस्फोटाचा दावा

2012मध्ये ओमर यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. पायलनं घटस्फोट द्यायला नकार दिला म्हणून हा खटला रद्द झाला. पण ओमर यांनी पुन्हा तो दाखल केला आणि कोर्टात तो सुरू आहे.

ओमर यांना करायचंय पुन्हा लग्न

ओमर त्या न्यूज अँकरच्या प्रेमात आहेत. त्यांना तिच्याशी लग्न करायचंय. ती अँकरही घटस्फोटित आहे. जम्मूच्या एका वरिष्ठ पत्रकाराच्या म्हणण्याप्रमाणे ओमर संवेदनशील आणि चांगले आहेत.

- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

First published: April 6, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading