Love Story : इम्रान खाननं 'या' हिंदी अभिनेत्रीचं प्रेम ठोकरलं

एका पत्रकारानं झीनत अमानला इम्रान खानबद्दल विचारलं. झीनतचा चेहरा लाल झाला. म्हणाली, या झाल्या जुन्या गोष्टी. त्याबद्दल न बोललेलं बरं.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 06:38 PM IST

Love Story : इम्रान खाननं 'या' हिंदी अभिनेत्रीचं प्रेम ठोकरलं

मुंबई, 04 मार्च : काही वर्षांपूर्वीची गोष्ट. बाॅलिवूड अभिनेत्री झीनत अमानला लाहोरमध्ये बोलावलं होतं. तिथल्या एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये पत्रकार परिषद होती. तेव्हा एका पत्रकारानं झीनत अमानला इम्रान खानबद्दल विचारलं. झीनतचा चेहरा लाल झाला. म्हणाली, या झाल्या जुन्या गोष्टी.  त्याबद्दल न बोललेलं बरं.

इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रेहम खान यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय, 70च्या दशकातल्या बाॅलिवूडच्या सर्वात सेक्सी हिराॅइनबरोबर इम्रान यांचे संबंध होते.

झीनत आणि इम्रानची भेट

70 आणि 80च्या दशकात इम्रान आणि झीनतच्या रोमान्सची खूप चर्चा होती. 80च्या दशकात इम्रान खान पाकिस्तानी टीमचे कॅप्टन बनून आले होते. झीनत त्यावेळी एकदम बिनधास्त अभिनेत्री होती. तिचं शिक्षण लाॅस एंजिलिसमध्ये झालं होतं. तिचे वडील मुस्लिम आणि आई एंग्लो इंडियन होते. 1970मध्ये झीनतनं मिस इंडिया पॅसिफिक अॅवाॅर्ड जिंकला होता. नंतर तिनं माॅडेलिंग सुरू केलं.

भारतीय सिनेमातली पहिली सेक्स सिंबाॅल

झीनत अमाननं सिनेमात पाऊल ठेवलं होतं. ती सेक्स सिंबाॅल मानली जायची. इम्रान खान लेडी किलर होते. अनेक जणी त्यांच्यावर फिदा होत्या. ते तरुण होते, देखणे होते. त्यांची इमेज प्लेबाॅयची होती. झीनत आणि इम्रानची ओळख एका पार्टीत झाली. तेव्हापासून ते दोघं एकमेकांना भेटण्यासाठी वेडे व्हायचे.

दोघं असायचे साथ साथ

इम्रान यांचं शिक्षण आॅक्सफर्डमध्ये झालेलं. ते पुरोगामी होते. तशीच होती झीनत. ती इम्रानसाठी वेडीच झाली होती. जीव ओवाळून टाकला होता जणू. पाकिस्तानी क्रिकेट टीम ज्या ज्या ठिकाणी खेळायला जायची तिथे झीनत पोचायची. दोघं सोबत दिसायचे.

ड्रेसिंग रूममध्येही चर्चा

ज्या दिवशी इम्रान खान चांगलं बॅटिंग किंवा बाॅलिंग करायचे नाहीत तेव्हा असा समज असायचा की ते आदल्या संध्याकाळी झीनतबरोबर होते. झीनत अमानला त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण पाक क्रिकेटरचा असा काही इरादा नव्हता.

जेव्हा इम्रानच्या आईला आला होता फोन

रेहमच्या पुस्तकात लिहिलंय की, झीनतबरोबर त्याचं नाव जोडलं गेलेलं, ते खरं होतं अशी कबुली इम्राननं दिली होती. पण इम्रान त्या अभिनेत्रीसोबतच्या लैंगिक संबंधांपर्यंतच खूश होता. त्यांना हे नातं पुढं नव्हतं न्यायचं. इम्रानच्या आईला हे पसंत नव्हतं.

पुस्तकात लिहिलंय, एकदा मी इम्रानच्या आईला याबद्दल विचारलं होतं. तेव्हा त्या हसून म्हणाल्या होत्या, इम्राननं तिच्याशी लग्न केलंय का विचारायला मला फोन आला होता. पण मी त्यांना सांगितलं माझा मुलगा 'अशा' मुलीशी लग्न करणं शक्य नाही.

इम्रान खान सारखे भारतात यायचे

त्या काळात इम्रान झीनत अमानला भेटायला भारतात यायचे. अनेक बँड्सच्या जाहिरातीच्या शूटसाठी भारतात यायचे. दोघांबद्दल बरंच छापून यायचं. लोक चवीनं वाचायचे.

झीनतचं लग्न मजहर खानसोबत

इम्रानबरोबरचे संबंध तुटल्यानंतर झीनतनं मजहर खानशी लग्न केलं. पण ते फार काळ टिकलं नाही. झीनत इम्रान खान यांना विसरू शकली नाही. त्या पत्रकार परिषदेतही 60 वर्षांच्या झीनत इम्रान यांचं नाव ऐकून लाजल्या होत्या.

संजय खानबरोबरही झीनतचे सूर जुळले

70 च्याच दशकतात झीनच अब्दुल्ला सिनेमाच्या वेळी संजय खानच्या जवळ आली. दोघांनी निकाह केला. तो दिवस होता 30 डिसेंबर 1978. 24 नोव्हेंबर 1979मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. संजयनं झीनतला मारपीटही केली होती.

रेखाबरोबर इम्रानचं अफेअर

अभिनेत्री रेखासोबतही इम्रान खानच्या अफेअरची चर्चा असायची. पण ती फार गंभीर नव्हती.


- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close