Love Story : जगातल्या 'या' सर्वश्रेष्ठ पुरुषाची पत्नी आहे 24 वर्षांनी लहान

Love Story : जगातल्या 'या' सर्वश्रेष्ठ पुरुषाची पत्नी आहे 24 वर्षांनी लहान

ही होती अमेरिकेची फर्स्ट लेडी आणि आताचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली भेट. तेव्हा मिलेनिया होत्या 28 वर्षांच्या आणि ट्रम्प होते 52 वर्षांचे.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : 1990ची ही गोष्ट आहे. सहा फूट उंच आणि सुंदर मिलेनिया न्यूयाॅर्कला आली होती. त्यावेळी पॅरिस आणि मिलानच्या प्रसिद्ध फॅशन जगात तिनं धूम माजवली होती. न्यूयाॅर्कमध्ये एका पार्टीत एक व्यक्ती तिच्या समोर आले. त्यांनी तिचं कौतुक केलंच. पाच मिनिटात फोन नंबर मागितला. ते होते डोनाल्ड ट्रम्प.

तेव्हा त्यांनी आपल्या दोन बायकांना घटस्फोट देऊन झाला होता. ते विश्वासार्ह नसल्याचं त्यांच्या बायकांनी सांगितलं होतं. त्या पार्टीलाही ते एका स्त्रीबरोबर आले होते. पण मिलेनियावरून त्यांची नजर हटत नव्हती. त्यांनी मिलेनियाला माॅडेलिंगचं स्वप्न दाखवलं.

ट्रम्प यांची प्रतिमा डागाळलेली

ही होती अमेरिकेची फर्स्ट लेडी आणि आताचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली भेट. तेव्हा मिलेनिया होत्या 28 वर्षांच्या आणि ट्रम्प होते 52 वर्षांचे. मिलेनियानं ट्रम्प यांचं नाव ऐकलं होतं. अमेरिकेच्या मॅगझीनमध्ये त्यांचे किस्से छापले जायचे.

ट्रम्पनी मिलेनियाला सांगितलं की ते पहिल्या भेटीत प्रेमात पडले होते. 2005मध्ये सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत मिलेनियानं सांगितलं की ट्रम्प त्यांना आवडले होते. दोघांचं डेटिंग सुरू झालं आणि लगेच ब्रेकअपही झालं.

दोघं वेगळे झाले

2000मध्ये निवडणुकीत ट्रम्पच्या पक्षाची वाईट परिस्थिती होती. त्यावेळी त्यांना मिलेनियाची आठवण यायला लागली. न्यूयाॅर्क टाइम्सला दिलेल्या इंटरव्ह्यूत त्यांनी तिचं कौतुक केलं होतं. पुन्हा दोघांनी डेटिंग सुरू केलं. एक दिवस ट्रम्प यांनी मिलेनियाला 1.5 मिलियन डाॅलरची अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोझ केलं होतं.

लग्नाच्या आधी केला करार

आधीच्या दोन पत्नींप्रमाणे मिलेनियाला एका करारावर सही करावी लागली. त्यानुसार लग्नानंतर  ती ट्रम्प यांच्या संपत्तीवर हक्क सांगणार नाही. 22 जानेवारी 2005मध्ये हे बहुचर्चित लग्न झालं. त्यांना नंतर एक मुलगा झाला. त्याचं नाव बॅरन ट्रम्प.

सर्व काही ठीक आहे?

अनेकांना त्यांच्या नात्याबद्दल शंका येते. लग्नाला 13 वर्ष झालीयत. सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र असतात. पण ती त्यांना हात धरू देत नाही. बऱ्याचदा ती त्यांच्या पुढे चालत जाते. तिचा चेहरा कोरा असतो. ट्रम्प यांच्याशी अनेक महिलांची नावं आजही जोडली जातायत. व्हाइट हाऊसमध्येही मिलेनिया पहिले 5 महिने राहायला आली नव्हती. नंतर तिनं मुलाच्या शिक्षणाचं कारण दिलं.

पहिलं लग्न कसं झालं?

ट्रम्प यांनी दोन लग्न केली होती. पहिली पत्नी इवानाशी डोनाल्ड यांची भेट झाली 1976मध्ये. तेव्हा ते तरुण होते. इवानाचं लग्न झालेलं. ती सुंदर आणि स्टाइलिश होती. हे लग्न 14 वर्ष टिकलं. 1989मध्ये ब्रेकअपच्या बातम्या आल्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मार्ला मेपल्स आली. 1992मध्ये इवानाशी घटस्फोट झाला. पुढे इवानानं 3 लग्न केली.

मार्लाशी लग्न आणि ब्रेकअप

मार्लाशी त्यांनी 1993मध्ये लग्न केलं. ते 4 वर्ष टिकलं. मार्लाला ट्रम्प यांचा बाॅडिगार्ड आवडायला लागला. दोघांनी 1999 मध्ये घटस्फोट घेतला.

- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

First published: April 8, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading