मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Love People Day : इतरांना प्रेम देण्याचे असतात अनेक फायदे, जॉईंट फॅमिलीतील लोकांकडून नक्की शिकाव्या या गोष्टी

Love People Day : इतरांना प्रेम देण्याचे असतात अनेक फायदे, जॉईंट फॅमिलीतील लोकांकडून नक्की शिकाव्या या गोष्टी

प्रेम ही एक अत्यंत सुंदर आणि गोड भावना आहे. अशा या प्रेमाने खूप गोष्ट साध्य करता येतात आणि इतरांना आनंद देता येतो. म्हणूनच दरवर्षी 30 सप्टेंबरला लोकांवर प्रेम करण्याच्या दिवस म्हणजेच लव्ह पीपल डे साजरा केला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई 30 सप्टेंबर : प्रेम लोकांना एकत्र आणते आणि जेव्हा दोन लोक एकमेकांची पुरेशी काळजी घेतात, तेव्हा ही भावना वाढू लागते. प्रेमामध्ये भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक बंध असतात. प्रेम ही एक अत्यंत सुंदर आणि गोड भावना आहे. अशा या प्रेमाने खूप गोष्ट साध्य करता येतात आणि इतरांना आनंद देता येतो. म्हणूनच दरवर्षी 30 सप्टेंबरला लोकांवर प्रेम करण्याच्या दिवस म्हणजेच लव्ह पीपल डे साजरा केला जातो.

हा दिवस साजरा करण्याचा हेतू हाच असतो की, लोकांनी एकमेकांना प्रेम द्यावे, एकमेकांचा आदर करावा. ज्या लोकांचे नाते विश्वासावर, समजूतदारपणावर आणि काळजीवर बांधले गेले आहे त्यांना निसर्गात सर्वांगीण प्रेम अनुभवण्याची उत्तम संधी असते. एकमेकांना प्रेम देणं किती महत्वाचं असती आणि त्याचे किती फायदे असतात. हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप चांगले माहित असते. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्याने एकमेकांना प्रेम देणं आणि आदर करणं या गोष्टी सर्वांमध्ये रुजतात.

जॉईंट फॅमिलीतील लोक एकमेकांची कशी घेतात काळजी

- हल्ली बहुतेक काम करणा-या जोडप्यांसाठी घर आणि मुलांची काळजी घेणे ही सर्वात मोठी समस्या असते. मात्र संयुक्त कुटुंबात लोक एक्मेकांचो काळजी घेतात. मुलानं सांभाळण्यासाठी तुमच्यामागे अनेक लोक असतात. त्यामुळे तुम्हाला मुलांची काळजी करण्याची गरज नसते.

तुमचीही लहान मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाहीत? मग 'या' टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर

- जॉईन फॅमिलीत राहिल्याने एक प्रकारची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळते. गरज भासल्यास, तुम्ही न घाबरता तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून त्वरित मदत घेऊ शकता. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात.

- कुटुंबातील लोकसंख्येमुळे कामाचा ताणही बऱ्याच अंशी कमी होतो. घरातील कोणतेही काम तुम्हाला एकट्याने करावे लागत नाही. संयुक्त कुटुंबात सर्व लोक मिळून काम पूर्ण करतात. यामुळे प्रत्येकजण घरातील सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतो.

- वाढदिवसाच्या पार्टीपासून ते छोट्या-मोठ्या फंक्शन्सपर्यंत सर्व काही एकत्र कुटुंबात सण असल्यासारखे वाटते. प्रत्येक प्रसंग सुंदर आणि भव्य करण्यात घरातील लहान मुले तसेच वृद्ध मंडळीही खूप प्रयत्न करतात.

खाजगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांपासून सुटका करायची आहे? या टिप्स फोलो करा

- फिल्म इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध स्टार्स संयुक्त कुटुंबात राहणे पसंत करतात. कपूर घराण्यापासून ते बच्चनांपर्यंत गोविंदा, अनिल कपूर आणि शत्रुघ्न सिन्हासारखे स्टार्स अनेकदा संयुक्त कुटुंबात राहण्याला महत्त्व देताना दिसतात. अशाप्रकारे एकमेकांना प्रेम देणं आदर देणं हे जॉईंट फॅमिलीमध्ये शिकवलं जात.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mental health