Home /News /lifestyle /

Sex Education | शारीरिक आकर्षण, प्रेम की केमिकल लोच्या? कसं ओळखाल?

Sex Education | शारीरिक आकर्षण, प्रेम की केमिकल लोच्या? कसं ओळखाल?

ज्यावेळी बालवयातून आपण किशोरवयात आणि त्यानंतर तारुण्यात पदार्पण करतो, त्यावेळी 2 माणसांमधील नातं हे लैंगिक आकर्षण आणि प्रेमाची भावना यावरच तयार होतं. अशावेळी कोणतीही गोष्ट करण्यासाठी योग्य वयाची आणि प्रौढ होण्याचीही प्रतीक्षा करवत नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जानेवारी : ज्यावेळी बालवयातून (childhood) आपण किशोरवयात (teenage) आणि त्यानंतर तारुण्यात पदार्पण करतो, त्यावेळी 2 माणसांमधील नातं हे लैंगिक आकर्षण आणि प्रेमाची भावना यावरच तयार होतं. अशावेळी कोणतीही गोष्ट करण्यासाठी योग्य वयाची आणि प्रौढ होण्याचीही प्रतीक्षा करवत नाही. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, फक्त 4 महिन्यांपर्यंत तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ते फक्त आकर्षण असतं. मात्र, त्या व्यक्तीप्रती तुमच्या भावना त्यानंतरही तशाच कायम राहिल्या, तर ते खरं प्रेम (true Love) असू शकतं. पण, हे कसं ओळखायचं? चला जाणून घेऊया. बचपन का प्यार "मी नववीत होते आणि ते एक प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून काही आठवड्यांसाठी आमच्या शाळेत आले होते. ते खूपच चार्मिंग होते, दिसालयाही छान होते. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी माझ्या गणितात थोडीशी सुधारणाही केली. काही वर्षांनंतर कॉलेजमध्येही एका शिक्षकाबाबत माझी अशीच अवस्था झाली. फक्त इतकंच नव्हे, तर त्यांचा आणि माझा खूप सुंदर संसार असेल, आमची छोटी छोटी मुलं असतील, अशी स्वप्नंही मी रंगवली होती. दोन्ही वेळा मला जाणवलेलं आकर्षण फक्त शारीरिक होतं, मी कधीही ते व्यक्त केलं नाही" – मीना, वय 26, पत्रकार, दिल्ली आपल्यापैकी बऱ्याच जणांना शाळेत असं कोणी ना कोणी तरी आवडायचं, हो की नाही? प्रत्येकाचा एक आवडता शिक्षक तर हमखास होताच. कोणाला कोण आवडतं यावरून गॉसिपिंग व्हायचं, चिडवाचिडवी व्हायची. खरं तर आता तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचं मुलींचं वय 9 आणि मुलांचं वय 11 झालं आहे. तारुण्यात पदार्पण करतो न करतो तर या वयातील सर्व मुलमुली अगदी प्रौढ झाल्यासारखंच वागतात. तारुण्य त्यांना सेक्शुअली उत्तेजित करतं. त्यातही मुलांच्या तुलनेत मुली लवकर वयात येतात. ज्यामुळे त्या या सर्व अनुभवातून सर्वात आधी जातात. लैंगिक भावनांना उत्तेजित करणारे टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रॉजेन या हार्मोन्सला आलेलं उधाण एखाद्या चक्रीवादळापेक्षा कमी नाही. यामुळे मुलंमुली Happily ever after च्या काल्पनिक दुनियेत जगतात. मग पहिलं किस, पहिल्यांदा सेक्स अशा सर्व गोष्टी यात होऊ शकतात. दिवसातून कितीतरी वेळा आपल्या त्या खास व्यक्तीला पाहण्याची इच्छा होते. भूक मरते, झोप लागत नाही आणि कशातही लक्ष लागत नाही. स्वप्नवत, जवळजवळ फिल्मी रोमान्सची सिक्रेट अशी ही दुनिया असते. "मी माझ्या घरात वडिलांना मारहाण करताना पाहिलं आहे. त्यामुळे भीतीपोटी मी सर्वच पुरुषांपासून नेहमी दूरच राहायचे. मात्र माझ्या एका मैत्रिणीचा मित्र मला आवडू लागला. तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता. आम्ही सुरुवातीला फोनवर एकमेकांशी बोलायचो. हळूहळू आमच्यातील जवळीक वाढू लागली. सेक्शुअली नाही मात्र भावनिकरीत्या आम्ही एक झालो, एकमेकांची काळजी करू लागलो. तो माझ्यासाठीच जन्माला आला आहे, त्याच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही असं मला वाटू लागलं. त्यानंतर आम्ही भेटायचं ठरवलं. दिल्लीतल्या हुमायूँ कबरीजवळ आमची पहिली भेट झाली. एका अंधाऱ्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. तिथं त्याने मला किस केलं आणि तो निघून गेला. मला खूप वाईट वाटलं, मी स्तब्धच झाले" – पूज्या (नाव बदलेलं), वय 25. शिक्षिका, दिल्ली) कुछ कुछ होता है एखादी गोष्ट करू नये, असं सांगितल्यावर तेच करण्याची उत्सुकता आपल्याला असते. भारतात सेक्सबाबत हेच होतं आहे. लग्नाअगोदर सेक्स करू नये, असं कित्येक तरुण-तरुणींना सांगितलं जातं आणि त्यामुळे त्यांना त्याबाबत जास्त आकर्षण वाटून लागतं, ते हवंहवंसं वाटतं. Sex Education | सुरक्षित सेक्सशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? "मी 13 वर्षांचा होतो. मस्तरमा कॉमिक्स आणि माझ्या मित्रांकडून सेक्सबाबत मला थोड्याफार प्रमाणात माहिती होती. मात्र जेव्हा मला पहिल्यांदाच एका मुलीबाबत आकर्षण वाटू लागलं आणि मी उत्तेजित झालो, तेव्हा मात्र मला खूप भीती वाटू लागली. ती माझ्या शेजारी राहायची, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचं भेटणं व्हायचं. माझ्याकडे पाहून नेहमी हसायची. मी तिला एकदा माझ्यासह सिनेमा पाहण्यासाठी बोलावलं, तिला गिफ्ट आणि लेटर्सही पाठवली. मात्र तिनं 'वडील आपल्या नात्यासाठी तयार होणार नाहीत', असं म्हणत मी तिला देऊ केलेलं सर्व काही नाकारलं. तिला हो म्हणायचं होतं मात्र तरी ती नाही म्हणाली असं समजायचं का मी?" – असीम, अनिमेशन आर्टिस्ट, वय 23, नाशिक किशोरवयीन मुलं आणि मुली यांना एकमेकांप्रती असलेलं आकर्षण आजही कित्येक कुटुंबांना मान्य नाही, त्यामुळे आपल्याला एखादा मुलगा आवडला किंवा एखादी मुलगी आवडली तरी मुलंमुली आपल्या घरी सांगत नाहीत, कुटुंबापासून हे लपवून ठेवतात. शिवाय वयाच्या तेराव्या वर्षात असलेल्या भावना वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वयात असलेल्या भावनांप्रमाणे ठोस आणि दृढही नसतात. शाळा आणि कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असणं म्हणजे एक प्रकारचं फॅडचं झालं आहे. शाळेची सहल, कॉलेजमधील कार्यक्रम, फॅमिली गॅदरिंगच्या निमित्ताने एकमेकांशी बोलणं होतं आणि त्यानंतर हळूहळू ग्रुपमधून दोघांनाही एकांत हवा असतो, जिथं शारीरिक जवळीकही साधली जाऊ शकते. जमाना है दुश्मन मोहब्बत का भारतात किशोरवयीन मुलांमधील रोमान्स प्रेम मानलं जात नाही. बहुतेक पालकांना हे फक्त सेक्ससाठी आहे, असंच वाटतं. जिथं कौमार्य आणि लग्नाला प्राधान्य दिलं जातं, तिथं अशापद्धतीची विचारधारा असणं साहजिकच आहे. त्यामुळे ते अशा आकर्षणाला वेड, क्रश, puppy love असं म्हणतात आणि त्याला फारसं गांभीर्यानं घेत नाहीत. या अर्धवट वयातलं असं आकर्षण बहुधा एकतर्फी असतं. दोन्ही बाजूंनी आकर्षण असेल तरी बऱ्याचदा नकार, त्या नकाराची भीती, मित्र-मंडळींकडून टिंगल किंवा चिडवा-चिडवी असं सगळं त्याबरोबर येतं. स्वतःच्या शरीराविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी असलेला न्यूनगंड आणि आयडेंटिटी क्रायसिससुद्धा या वयात त्याबरोबरीने येतो. माझ्यावर प्रेम आहे की नाही? कमी वयात एखाद्या व्यक्तीप्रती वाटणारं आकर्षण प्रामुख्याने 3 प्रकारचे असतात. Identity crush – अशी एखादा व्यक्ती ज्याची खूप प्रशंसा होते, त्याचं अनुकरण आपण करतो. आपणही त्याच्यासारखं व्हावं असं आपल्याला वाटतं. एक आदर्श जोडीदार म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहतो. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास शाळेतील एखादा शिक्षक किंवा शिक्षिका आपल्याला खूप आवडणं. हे आकर्षण खरंतर एकतर्फीच असतं. Romantic crush – आपल्याच वयाच्या व्यक्तीकडे आपण आकर्षित होतो. ही व्यक्ती आपल्या आसपास राहणारी किंवा वावरणारी असते आणि कधीकधी त्या व्यक्तीकडूनही तशाच प्रकारचा प्रतिसादही मिळत असतो. Celebrity crush - हेदेखील एक आपल्याच कल्पनेत आपण रंगवलेलं प्रेम असतं. जिथं परस्परसंवाद नसतो. फक्त काल्पनिक संवाद आणि काल्पिनक भेट होते, ज्यामुळे हस्तमैथुनासाठी उत्तेजना मिळते. पौंगडावस्थेची सुरुवात या अशा आकर्षणाने होते, असं म्हणतात. अशा पद्धतीने तयार झालेली रिलेशनशिप एका विशिष्ट काळापुरतीच मर्यादित राहते, नंतर हवेत विरून जाते. मात्र यामुळे तरुणांना व्यवहारज्ञान विकसित होतं. त्यांना स्वत:सह विरुद्धलिंगी व्यक्तीची ओळख, प्राधान्य याबाबत माहिती होते. या अशा प्रेमाच्या निमित्ताने का होईना, इतर गोष्टीत रस निर्माण होतो. जसं की, 'ती टेनिस शिकते, तर मीदेखील टेनिस खेळायला शिकणार', 'त्याला वाचन आवडतं, तर मीदेखील काहीतरी वाचायचा प्रयत्न करणार'. म्हणजे अशी नाती एकप्रकारे प्रेरणाच देतात असं म्हणण्यास हरकत नाही. कमी वयात असलेलं आकर्षण खरं प्रेम असेलच असं नाही. कारण प्रेमासाठी संयम आणि लक्ष या दोन गोष्टी खूप आवश्यक असतात आणि या वयात या दोन्ही गोष्टी क्वचितच असतात. मात्र कदाचित पुढे जाऊन हे आकर्षण खऱ्या प्रेमात बदलूही शकतं. तोपर्यंत संमती आणि सुरक्षा या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रेम करत राहा. लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sex education, Sexual health

    पुढील बातम्या