Home /News /lifestyle /

काय सांगता? 1 लाख 72 हजार वर्षांपूर्वीची लुप्त झालेली नदी पुन्हा सापडली

काय सांगता? 1 लाख 72 हजार वर्षांपूर्वीची लुप्त झालेली नदी पुन्हा सापडली

सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये वाळवंटात नद्यांचे जाळं असल्याचे समोर आल्याची माहिती एका संशोधनकर्त्याने दिली.

    मुंबई, 23 ऑक्टोबर : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताची सांस्कृतिक महती संपूर्ण जगभरात पसरली आहे. अनेक ऐतिहासीक वस्तूंचे अवशेष आजदेखील भारतात आढळून येतात. नुकतेच राजस्थानमधील थार वाळवंटात बिकनेरजवळ एक विलुप्त झालेल्या नदीचे अवशेष सापडले आहेत. 1 लाख 72 हजार वर्षांपूर्वी ही नदी अस्तित्वात असल्याचे देखील समोर आले आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी राहत असलेल्या नागरिकांसाठी ती जीवनवाहिनी होती. पाषाण काळातील नदी हे संशोधनाची पडताळणी क्वाटर्नरी सायन्स रिव्यूज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये थार क्षेत्रातील नद्यांच्या उत्खननासंबंधी संकेत देण्यात आले आहेत. या संशोधनामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, मॅक्स प्लॅंक इंस्टिट्यूट फॉर द सायन्स ऑफ ह्यूमन हिस्ट्री जर्मनी, तामिळनाडूमधील अण्णा यूनिवर्सिटी, आणि IISER कोलकाताच्या संशोधनानुसार थारमधील आजच्या नागरिकांपेक्षा पाषाण काळातील नागरिक वेगळे जीवन जगत होते. नागरिकांची जीवनवाहिनी या संशोधनात समोर आले आहे, लुप्त झालेली ही नदी राजस्थानमधील बिकानेरजवळ वाहत होती. या काळात तेथे वाहत असलेल्या नदीपासून हा परिसर 200 किलोमीटर दूर आहे. ही नदी पाषाण युगातील लोकांसाठी जीवनवाहिनी होती. तसेच या नदीचे अवशेष हे सध्या कोरड्या पडलेल्या घग्गर नदीच्या देखील खूप आधीपासूनचे आहेत. तसेच ही नदी इथल्या नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी महत्वाचा मार्ग होती. वाळवंटात नद्यांचे जाळे सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये वाळवंटात नद्यांचे जाळं असल्याचे समोर आल्याची माहिती एका संशोधनकर्त्याने दिली. अण्णा यूनिवर्सिटीच्या प्रोफेसर हेमा अच्युतन यांनी याविषयी सांगितले, या ठिकाणी जुन्या काळात नद्या अस्तित्वात होत्या, पण त्या कोणत्या काळात अस्तित्वात होत्या याचा तपास होऊ शकत नाही. या नद्या कोणत्या काळामध्ये वाहत होत्या याचा तपास करण्यासाठी वाळवंटातील जमिनींचे प्रमाण घेण्याची गरज आहे. खाणींमध्ये मिळाले अवशेष यासाठी या टीमने केलेल्या नाल गावाजवळील खाणींमधून निघालेल्या नदीचा अभ्यास केला. यामध्ये संशोधकांनी विविध गोष्टींचा अभ्यास करत या नदीच्या विविध टप्पांची नोंदणी केली. अनेकदा दुर्लक्ष केले गेले या थार वाळवंटात विलुप्त झालेल्या नद्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना नेहमी दुर्लक्षित केले गेल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मॅक्स प्लॅंक इंस्टीट्यूट फॉर द सायन्स ऑफ ह्यूमन हिस्ट्री मधील जिमबॉब ब्लिंकहोर्न यांनी याविषयी संगितले, थार वाळवंटातील नागरिक हे केवळ आपले जीवन जगत नव्हते तर याठिकाणी संपन्नता देखील मोठ्या प्रमाणावर होती. त्याचबरोबर या ठिकाणी जीवन जगण्यासाठी नद्या किती महत्वाच्या होत्या हे आम्हाला माहित आहे. पण या ठिकाणी असणाऱ्या नद्यांची सिस्टीम कशी होती यासंदर्भात आमच्याकडे खूप कमी प्रमाणात माहिती आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या