मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight loss tips : या 5 गोष्टी तुमचं वाढलेलं वजन घटवण्यात आहेत फायदेशीर; असा करा आहारात समावेश

Weight loss tips : या 5 गोष्टी तुमचं वाढलेलं वजन घटवण्यात आहेत फायदेशीर; असा करा आहारात समावेश

लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, युरिक अ‌ॅसिड आणि मधुमेह यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. आजकालच्या धावपळीच्या काळात वजन योग्य प्रमाणात राखणे महत्वाचे आहे.

लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, युरिक अ‌ॅसिड आणि मधुमेह यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. आजकालच्या धावपळीच्या काळात वजन योग्य प्रमाणात राखणे महत्वाचे आहे.

लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, युरिक अ‌ॅसिड आणि मधुमेह यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. आजकालच्या धावपळीच्या काळात वजन योग्य प्रमाणात राखणे महत्वाचे आहे.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : लठ्ठपणा ही वेगाने वाढणारी समस्या आहे. यामागचे कारण उलटा आहार आणि चुकीची जीवनशैली असे मानले जात आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की लठ्ठपणा ही एक अशी गोष्ट आहे, जी भविष्यात अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

जर तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. या बातमीमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गोष्टींची माहिती देत आहोत, ज्याच्या नियमित सेवनाने तुम्ही काही आठवड्यांत लठ्ठपणापासून मुक्ती (weight loss tips) मिळवू शकता.

वजन कमी करणे महत्वाचे का आहे?

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, युरिक अ‌ॅसिड आणि मधुमेह यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. आजकालच्या धावपळीच्या काळात वजन योग्य प्रमाणात राखणे महत्वाचे आहे. संतुलित आहाराच्या मदतीने तुम्ही वजन कमी (how to loss weight) करू शकता.

वजन कमी करण्यासाठी या गोष्टी खा

1. सफरचंद सायडर व्हिनेगर

संशोधनानुसार, सफरचंद व्हिनेगरमध्ये एसिटिक अ‌ॅसिड नावाचा घटक असतो, जो चयापचय वाढवू शकतो. हे अन्न घेण्याचे प्रमाण कमी करून पोट भरून राखण्यास मदत करते.

हे वाचा - VIDEO : हुशार नवऱ्याची कमाल; पत्नीसाठी उभारलं अस्सं घर की आता पर्यटनाचं झालंय केंद्र!

2. पुरेसे पाणी प्या

आहार तज्ज्ञ डॉ रंजना सिंह म्हणतात की, जास्त खाणे वजन कमी करण्यासाठी खूप हानिकारक असू शकते. हे टाळण्यासाठी, आपण नेहमी आपल्या सर्व जेवणापूर्वी भरपूर पाणी पिण्यावर भर देऊ शकता. यामुळे तुमची भुखेची तल्लफ कमी होणार आणि तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी तृप्त वाटेल.

3. तुलसी-अजवाइन काढा

तुळस आणि अजवाइन या दोन्हींच्या बिया वजन कमी करण्यास मदत करतात. एक चमचा वाळलेल्या अजवाइन बिया एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. यानंतर, सकाळी तुळशीची पाने अजवाईनच्या पाण्यात उकळा. आता एका ग्लासमध्ये पाणी गाळून ते सेवन करा. यामुळे वजन कमी होऊ शकते.

हे वाचा - Job Alert: बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा इथे प्राध्यापक पदांसाठी मोठी पदभरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

4. ब्लॅक कॉफी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. ब्लॅक कॉफीमध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म असतात, जे लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय मानला जातो.

5. ग्रीन टी

ग्रीन टी हा कॅटेचिन आणि कॅफीनचा समृद्ध स्रोत आहे. हे चयापचय वाढविण्यात मदत करते. संशोधनानुसार, कॅफीन चरबी जाळण्यास मदत करते. यासोबतच हे वजन कमी करण्यास मदत करते. झोपेच्या आधी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता.

First published:

Tags: Health Tips, Weight loss