मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता Fair कायमचं हटणार; HUL नंतर जगातील या मोठ्या कॉस्मेटिक कंपनीनेही घेतला निर्णय

आता Fair कायमचं हटणार; HUL नंतर जगातील या मोठ्या कॉस्मेटिक कंपनीनेही घेतला निर्णय

Fair & lovely प्रमाणे आपल्या सर्व स्किन प्रोडक्ट्समधील फेअर शब्द हटवण्याचा निर्णय L'Oreal ने घेतला.

Fair & lovely प्रमाणे आपल्या सर्व स्किन प्रोडक्ट्समधील फेअर शब्द हटवण्याचा निर्णय L'Oreal ने घेतला.

Fair & lovely प्रमाणे आपल्या सर्व स्किन प्रोडक्ट्समधील फेअर शब्द हटवण्याचा निर्णय L'Oreal ने घेतला.

मुंबई, 26 जून :  Fair & lovely तून फेअर जाणार असल्याने सर्वांना त्याचा आनंद झाला. आता आणखी एका कंपनीच्या स्किन क्रिम प्रोडक्टमधून फेअर हा शब्द हटणार आहे. ही कंपनी आहे L'Oreal. जगातील सर्वात मोठी कॉस्मेटिक कंपनी. या कंपनीनेही आता आपल्या स्किन केअर प्रोडक्टमधून व्हाइट, फेअर आणि लाइट हे शब्द हटवण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे.

फेअरनेस क्रिमवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. फेअरनेस क्रिमच्या अशा जाहिराती, मार्केटिंग करून वर्णभेदाला प्रोत्साह दिलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर टिकेची झोड उठली आहे. फेअर अँड लव्हली तर आधीपासूनच अशा वादात अडकलं होतं.

हे वाचा - सुशांतलाही मिळाली होती Fairness cream ची जाहिरात; धुडकावली कोट्यवधींची ऑफर

1975 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद करत असल्याची, गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली.

हे वाचा - FAIR & LOVELY तील 'फेअर' घालवण्यासाठी लढली ही मुंबईची मुलगी

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर पुन्हा वर्णभेदाचा वाद उफाळून आला. ब्लॅक लाइव्हज मुव्हमेंट सुरू झाली. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या स्किन व्हाइटनिंग उत्पादनांची विक्री थांबवली. भारतातही त्याचे परिणाम दिसून आले. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आला. ज्याला अनेकांनी पाठिंबा दिला आणि हिंदुस्तान युनिलिव्हरने फेअर अँड लव्हलीमधील फेअर शब्द काढण्याचा निर्णय घेतला. आपल्या या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला. सौंदर्य फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नाही. त्यामुळे फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग असे शब्दच हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये नसणार आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे.

हे वाचा - FAIR & LOVELY तून फेअर जाणार असल्याने ही अभिनेत्री आनंदी, VIDEO तून झाली व्यक्त

दरम्यान या निर्णयानंतर भारतातील फक्त सामान्य नागरिकच नव्हे तर बॉलीवूड सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला आहे. शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री कंगना रणौत, बिपाशा बासू, अभय देओल यांसारख्या फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारणाऱ्या कलाकारांनाही आनंद झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील याबाबत आपल्या सोशल मीडियावर व्यक्त झाली होती.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Fairness cream