Home /News /lifestyle /

वजन कमी करायचं आहे? फक्त 5 DRINK तुम्हाला बनवतील स्लिम ट्रीम

वजन कमी करायचं आहे? फक्त 5 DRINK तुम्हाला बनवतील स्लिम ट्रीम

कोरोनाच्या (Coronavirus) संकटात लॉकडाऊनमुळे (Lockdown) किंवा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अनेकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. परिणामी काही शारीरिक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. त्यामुळे वाढलेले वजन ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 सप्टेंबर : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात लॉकडाऊनमुळे (Lockdown) किंवा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अनेकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. परिणामी काही शारीरिक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. त्यामुळे वाढलेले वजन ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. मात्र घरच्या घरी अगदी चटकन होणारी आणि आरोग्याला उत्तम अशी काही पेयं आम्ही आज सांगणार आहोत जी तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करतील. सध्याच्या जीवनशैलीत पौष्टिक आहार, वेळेवर जेवण, योग्य जीवनशैली या बाबींना आता अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. अशा स्थितीत अनेक फळं त्यांचे रस आणि त्यापासून तयार होणारी इतर पेयं यांचं महत्त्व सध्या जास्तच वाढलंय. विशेषत: ज्या फळांतून जीवनसत्त्वं मिळतात त्यांचं सेवन अधिक करा असं सगळेच डॉक्टर सांगतात. सी जीवनसत्त्व आपली प्रतिकारशक्ती वाढवतं. यासह अनेक पेयं ही वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. लिंबू सरबत सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेही तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. यात ॲन्टिऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या शरीरातील फॅट कमी करतात. (हे वाचा-Iodine ने फक्त 15 सेकंदात केला कोरोना व्हायरसचा नाश; तज्ज्ञांचा दावा) लिंबू पाण्यात एक चमचा मध टाकून प्यायल्यास हे अधिक फायदेशीर ठरते. लिंबू पाणी बनवण्यास सोपे आणि त्यासाठी लागणारे घटक देखील सहज उपलब्ध होणारे असतात. ग्रीन टी ग्रीन टी ही वजन कमी करण्यास मदत करणारं एक पेय आहे. कॅथेचिनसारखे  ॲन्टिऑक्सिडंट्स यात असतात जे चयापचय क्रिया सुधारून आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात. ग्रीन टी साखर टाकून किंवा साखरेशिवाय तुम्ही घेऊ शकता. दिवसातून 3 ते 5 कप ग्रीन टी घ्यायला हरकत नाही. जिऱ्याचं पाणी जिरं घातलेले पाणी प्यायल्याने पचनाची क्रिया सुधारते. वजन कमी करण्यास ते फायदेशीर ठरतं. या पेयामुळे भूक कमी होते व तुमचं आवश्यक खाण्याव्यतिरिक्त होणारं खाणं कमी होतं. यामुळे तुमचं वजन घटण्यास मदत होते. यासाठी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर टाकून ठेवावे आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्यावे. (हे वाचा-90% महिलांनी आपली किडनी देऊन वाचवला पतीचा जीव; पत्नीसाठी सरसावले फक्त 10% पुरुष) कोरफड ज्यूस ॲलोव्हेरा अर्थात कोरफडीचे असंख्य गुणकारी फायदे आहेत. यात मिनरल आणि  ॲन्टिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे तुमची पचनशक्ती सुधरण्यात मदत करतात. यासाठी दोन किंवा 4 चमचे कोरफडीचा गर घेऊन तो एक ग्लास पाण्यात टाकावा. यात चांगल्या चवीसाठी तुम्ही लिंबू आणि मध टाकू शकता. ग्रीन कॉफी ग्रीन कॉफी तुमच्या फॅटचे उर्जेत रूपांतर करते. सुटलेले पोट लवकर कमी करते. वजन कमी करण्यास मदत करते.            
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Weight loss, Weight loss tips

    पुढील बातम्या