नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 31 मार्च : नवीन फॅशनचे, आकर्षक रंगांचे टी शर्ट्स घालायला अनेकांना आवडतं. त्याच्यावरील प्रिंट्सही सध्या चर्चेत असता. तुम्ही टी शर्टवर वेगवेगळी नावं तसंच हिंदी किंवा इंग्रजी कोट्स लिहिलेलं पाहिलं असेल. आता खास मराठी कोट्स असलेल्या टी शर्ट्स कलेक्शन ऑनलाईन उपलब्ध झालंय. मुंबईकर मित्रांनी सुरु केलेलं हे कलेक्शन अवघ्या काही महिन्यातच लोकप्रिय झालं आहे.
कशी सुचली कल्पना?
रोहित गराटे आणि स्वप्नील हुद्दार या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन मित्रांची ही संकल्पना आहे. लॉकडाऊनच्या काळात ते 'वर्क फ्रॉम होम' काम करत होते. त्यावेळी आपण मजेशीर कोट्स टी शर्टवर प्रिंट्स करून विकू शकतो, अशी कल्पना त्यांना सुचली आणि ते कामाला लागले. त्यांनी सुरूवातीला मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कोट्स असलेल्या टी शर्टची विक्री केली. काही दिवसांनी फक्त मराठी कोट्स असलेले टी शर्ट विकण्याचा निर्णय घेतला.
चहा प्या आणि कप खाऊन टाका! शिवाजी पार्कमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, पाहा Video
मराठी कोट्स असलेल्या टी शर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानंच त्यांनी हा निर्णय घेतला. मराठी भाषा खुप समृद्ध आहे. विविध वाक्प्रचार, म्हणी आपण बोलण्यातून वापरतो. त्याच शब्दांना फिरवून पुन्हा मजेशीर वाक्य तयार करून सुंदर रंग संगतीचे टी शर्ट्स त्यांनी विक्रीसाठी तयार केले. त्याची स्वत: साईटवर विक्री सुरू केली.
मराठी भाषा खुप वेगळी आहे. रोजच्या बोलण्यात सहज येणारे कोट आम्ही टी शर्ट्सवर छापले. 'कष्ट is मस्ट' हा आमचा बेस्ट सेलर टी शर्ट आहे. त्याचबरोबर घरात कुणी जास्त बोलणारं असेल तर कटकट करू नकोस हा टी शर्टही अनेक जणं घेतात. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या मंडळींमध्ये 'गड किल्ले कॉलिंग' या टी शर्टला मोठी मागणी आहे. या पद्धतीचे अनेक टी शर्ट्स उपलब्ध आहेत, असं रोहित आणि स्वप्नील यांनी सांगितलं. लहान मुलांच्या टी शर्ट्समध्ये 'आईला नाव सांगू का?', 'गोंडस', 'माझे गाल ओढायचे नाहीत,' हे बेस्ट सेलर टी शर्ट आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबईतील ‘या’ दुकानात मिळतात अस्सल कोल्हापुरी चप्पल, सेलिब्रेटीही करतात खरेदी पाहा, Video
किती आहे किंमत?
मोठ्यांच्या टीशर्ट्सची किंमत 350 ते 550 तर लहान मुलांच्या टी शर्ट्सची किंमत ही 299 ते 400 रुपयांच्या दरम्यान आहे. अतरंगी टी शर्ट्स (https://atarangee.in/) या त्यांच्या खास साईटवर हे टी शर्ट्स मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.