मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रात्री उशिरापर्यंत मोबाइल स्क्रीन पाहताय? वेळीच सावध व्हा, नाही तर उद्भवू शकते 'ही' गंभीर समस्या

रात्री उशिरापर्यंत मोबाइल स्क्रीन पाहताय? वेळीच सावध व्हा, नाही तर उद्भवू शकते 'ही' गंभीर समस्या

 झोपण्यापूर्वी मोबाइल पाहण्याची सवय बहुतांश जणांना असते, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो; मात्र या सवयीमुळे केवळ डोळ्यांचंच नाही, तर आणखीही बरंच नुकसान होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

झोपण्यापूर्वी मोबाइल पाहण्याची सवय बहुतांश जणांना असते, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो; मात्र या सवयीमुळे केवळ डोळ्यांचंच नाही, तर आणखीही बरंच नुकसान होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

झोपण्यापूर्वी मोबाइल पाहण्याची सवय बहुतांश जणांना असते, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो; मात्र या सवयीमुळे केवळ डोळ्यांचंच नाही, तर आणखीही बरंच नुकसान होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: आज काल बरेच जण रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर ऑनलाइन असतात. झोपण्यापूर्वी मोबाइल पाहण्याची सवय बहुतांश जणांना असते, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो; मात्र या सवयीमुळे केवळ डोळ्यांचंच नाही, तर आणखीही बरंच नुकसान होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. मोबाइलमधून येणारा निळा प्रकाश, तसंच लॅपटॉप आणि एलईडी स्क्रीनमधून येणारा प्रकाश हा अप्रत्यक्षरीत्या रक्तातल्या साखरेचं (Blue light from mobile and blood sugar) प्रमाण वाढवत असल्याचं संशोधनात दिसलं आहे.

खरं तर संशोधकांनी हा प्रयोग उंदरांवर केला आहे; पण आपलं शरीर आणि उंदरांचं शरीर यात 80 टक्के हार्मोनल आणि फिजिओलॉजिकल (Human body similar to rats) समानता आहे. त्यामुळे कित्येक औषधांची मानवी चाचणी होण्यापूर्वी उंदरांवर त्याची चाचणी करण्यात येते. तसंच, आतापर्यंत उंदरांवर यशस्वी झालेले जवळपास 100 टक्के प्रयोग मानवांवरही यशस्वी झाले आहेत. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

स्ट्रासबर्ग विद्यापीठ (Strasberg University) आणि अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठातल्या (Amsterdam University) संशोधकांनी संयुक्तपणे याबाबत संशोधन केलं आहे. संशोधकांनी उंदरांवर केलेल्या एका प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली आहे. वैज्ञानिकांनी उंदरांना रात्रीच्या वेळी आर्टिफिशिअल प्रकाशासमोर (Artificial light increases sweet cravings) ठेवलं. यामुळे त्यांची गोड खाण्याची क्रेव्हिंग्ज आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाणही वाढल्याचं दिसून आलं. यासोबतच, जास्त वेळ लाइटच्या समोर राहिल्यामुळे त्यांच्या वजनामध्येही वाढ (Late night use of mobile increases fat) झाल्याचं दिसून आलं.

हेही वाचा-  Winter health tips : हिवाळ्यात ठणठणीत राहायचं; चहा-कॉफीऐवजी दररोज सकाळी प्या एक ग्लास Detox drink

 विशेष म्हणजे, आर्टिफिशिअल प्रकाश आणि रेडिएशनचा आपल्या रक्तातल्या साखरेशी असलेला संबंध याबाबत आणखीही अनेक संशोधनं उपलब्ध आहेत. तुम्ही आर्टिफिशिअल ब्लू लाइट आणि शुगर क्रेव्हिंग्ज असे कीवर्ड्स टाकून सर्च केलं, तर दहाहून अधिक रिसर्च पेपर (Artificial blue light and sugar cravings) तुम्हाला मिळतील. या सगळ्या संशोधनांमध्ये हेच सिद्ध झालं आहे, की रात्री अधिक काळ मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या समोर राहिल्यामुळे गोड खाण्याची इच्छा (Late night TV increases sugar craving) अधिक वाढते. यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाणही वाढत जातं. परिणामी उंदरांप्रमाणेच मानवांमध्येही जाडी वाढण्याची भीती असते.

हेही वाचा- हिवाळ्यातल्या आहारात अवश्य समावेश करा बाजारीचा, होतील अनेक फायदे

त्यामुळेच, तुम्हालाही रात्री उशिरापर्यंत जागल्यावर गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर त्याचं कारण तुमचा मोबाइल किंवा लॅपटॉपचा प्रकाश आहे. याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्हाला रात्री मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर, तसंच उशिरापर्यंत टीव्हीदेखील (Avoid using mobile and laptop late night) पाहणं कमी करावं लागणार आहे. तुमचं कामच रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असेल, तर या किरणांपासून वाचण्यासाठी अँटी ग्लेअर ग्लासेसचा (Anti glair glasses) वापर करणं सुरू करावं. या ग्लासेसच्या वापरामुळे शंभर टक्के प्रोटेक्शन मिळत नसलं, तरी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचं स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनात सिद्ध झालं आहे.

First published:

Tags: Mobile