S M L

ही आहेत सुश्मिता सेनच्या सौंदर्याची गुपितं!

बॉलिवूड अभिनेत्री आणि सिंगल मदर सुश्मिता सेन सगळ्यांचीच आवडती आहे. तिच्या सौंदर्याप्रमाणेच ती स्वत:लाही तितकंच फिट ठेवते. ती वयाच्या 42व्या वर्षीही खूप तरुण दिसते.

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2018 06:27 PM IST

ही आहेत सुश्मिता सेनच्या सौंदर्याची गुपितं!

22 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री आणि सिंगल मदर सुश्मिता सेन सगळ्यांचीच आवडती आहे. तिच्या सौंदर्याप्रमाणेच ती स्वत:लाही तितकंच फिट ठेवते. ती वयाच्या 42व्या वर्षीही खूप तरुण दिसते. त्यामुळे तिच्या सौंदर्याचं गुपित जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असते.

1) सुश्मिता सेन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज डान्स करते. डान्स करणं एक व्यायामाचाच प्रकार आहे. त्यानं शरिरातील कॅलरिज कमी करण्यास मदत होते. त्यातून इंग्लिश गाण्यावर डान्स करण्याची मजा काही औरच आहे.

2) आपल्या मुलांची ताकद बनण्यासाठी आणि  त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सुश्मिता कंबरेचे व्यायाम करते. त्याने दिवसभर मुलांची मदत करण्यास तिला त्रास होतं नाही.

3) प्रत्येकाला स्वत:च्या हक्कासाठी लढावं लागतं. त्यामुळे ती रोज आपल्या हातांचा आणि पायांचा व्यायाम करते. कदाचित यामुळेच सुश्मिता सिंगल मदर असुनही मुलांच्या संगोपणासाठी सक्षम आहे.

4) यावर्षी आपल्या लाडक्या  सुश्मितानं एक नवा ध्यास घेतला आहे. तो म्हणजे तिला 6 पॅक बनवायचे आहेत. त्याच्यासाठी ती खूप मेहनतही करतं आहे.

5) या सगळ्यात खास म्हणजे सुश्मिताचा बॉडी बॅलेंस. ती तिच्या बॉडी बॅलेंसच्या मदतीने हात, कंबर आणि पायांवर खूप मेहनत करते.

6) बरं सुश्मिता सेन स्वत:चं व्यायाम नाही करत तर ती तिच्या मुलीला घेऊनही व्यायाम करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2018 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close