• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Lunar Eclipse 2021: 580 वर्षांनंतर होणार असं सर्वांत मोठं ग्रहण; कुठून दिसणार?

Lunar Eclipse 2021: 580 वर्षांनंतर होणार असं सर्वांत मोठं ग्रहण; कुठून दिसणार?

शुक्रवारी होणारं हे ग्रहण हे भारतील वेळेनुसार 11 वाजून 34 मिनटांनी सुरू होईल (lunar eclipse today live) तर संध्याकाळी 5 वाजून 33 मिनटांनी त्याची समाप्ती होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19  नोव्हेंबर : उद्या रात्री म्हणजेच 19 नोव्हेंबरला या वर्षाचा शेवटचा Lunar eclipse असणार आहे. हा योग कार्तिक पूर्णिमेला जुळुन आल्यामुळं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात खास गोष्ट अशी की चंद्रग्रहण (Chandra Grahan 2021) आणि उद्याचा कार्तिकी पूर्णिमाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आता हा योग 580 वर्षांनंतर आला आहे. उद्या होणारं हे ग्रहण हे भारतील वेळेनुसार 11 वाजून 34 मिनटांनी सुरू होईल (lunar eclipse today live) तर संध्याकाळी 5 वाजून 33 मिनटांनी त्याची समाप्ती होईल. त्याचा एकुण कालावधी 5 तास आणि 59 मिनिटं असेल. तर भारतात चंद्रग्रहण दुपारी 12:48 मिनिटांपासून तर 04:17 मिनिटांपर्यंत असणार आहे. कुठे पाहता येणार Live? जर तुम्ही चंद्रग्रहण लाईव्ह पाहणार असाल तर त्याला युट्युबवर (Lunar Eclipse 2021 Live Streaming) लाईव्ह पाहता येईल. त्याचबरोबर livescience आणि timeanddate या वेबसाईट्सही त्याचं लाईव्ह प्रसारण असणार आहे. या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) हे उद्या लागणार आहे. हे ग्रहण कार्तिक पूर्णिमेला लागणार आहे. भारतात ग्रहणांचा  परिणाम राशींवर (Zodiac) होत असतो अशी मान्यता आहे.

  धक्कादायक! फेसबुकद्वारे पाकिस्तानी हॅकर्स लोकांना करतायंत टार्गेट?

  काय असेल खास? 19 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातली पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या काळात अनेक गोष्टी करणं वर्ज्य मानलं जातं. तसंच, (Astrology) ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक चंद्रग्रहण केव्हा लागतं यानुसार त्याचा काही राशींवर (Zodiac Signs) वाईट तर काही राशींवर चांगला प्रभाव पडत असल्याचं दिसून येतं. या वेळचं चंद्रग्रहण प्रभाव वृषभ रास आणि कृत्तिका (Krittika) नक्षत्रात होणार आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: