2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल? येथे पाहा लिस्ट

2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल? येथे पाहा लिस्ट

या वर्षाचं एक सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, जवळपास सर्वच महिन्यात किमात एक तरी लाँग वीकेंड आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : नवीन वर्ष 2021 सुरू होऊन आता 15 दिवस उलटलेत. 2020 च्या आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या अनुभवानंतर सगळं जग देवाकडे एकच मागणं मागतंय हे नवं वर्ष 2020 सारखं नसावं. शनिवार-रविवारला जोडून एखादी सुट्टी आली की, नोकरदार आणि त्यांचे कुटुंबीय खूश असतात. लाँग वीकेंडची तयारी सुरू होते आणि कुठे जायचं, कसं जायचं याचं प्लॅनिंग सुरू होतं.

या वर्षाचं एक सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, जवळपास सर्वच महिन्यात किमात एक तरी लाँग वीकेंड आहे. जानेवारीत 1, 2, 3 आणि 14,15,16 हे लाँग वीकेंड होते. या वर्षात आणखीही लाँग वीकेंड येणार आहेत.

जानेवारी (January):

23 शनिवार, 24 रविवार आणि 26 जानेवारीला मंगळवार आला आहे. त्यामुळे जर तुम्ही सोमवारी 25 जानेवारीला सुट्टी टाकलीत, तर सलग चार दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

फेब्रुवारी (February):

13 शनिवार, 14 रविवार आणि 16 फेब्रुवारी मंगळवार वसंत पंचमीची सुट्टी. 15 फेब्रुवारीला रजा टाका दीर्घ सुट्टीचा आनंद घेऊ शकता. 1 ते 15 फेब्रुवारीदरम्यान हरियाणातील फरीदाबादमध्ये होणाऱ्या सूरजकुंड मेळ्याला तुम्ही भेट देऊ शकता.

मार्च (March):

11 मार्च गुरूवार महाशिवरात्रीची सुट्टी, 13 मार्च शनिवार, 14 मार्च रविवार. 12 मार्चला रजा टाक शकता.

दुसरं, 27 मार्च शनिवार, 28 मार्च रविवार आणि सोमवारी 29 मार्चला होळी. होळी साजरी करायला तुम्ही बनारस किंवा वृंदावनला जाऊ शकता.

एप्रिल (April):

2 एप्रिल शुक्रवार गुड फ्राय डेची सुट्टी, 3 एप्रिल शनिवार, 4 रविवार. आशियातला सर्वांत मोठा टुलिप फेस्टिव्हल पाहायला तुम्ही काश्मीरला जाऊ शकता.

मे (May):

13 मे गुरुवारी ईद-उल-फित्र, 14 मे शुक्रवारी रजा मिळाली, तर तुम्ही 13 ते 16 मे सुट्टी अनुभवाल. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये असलेल्या हिडिंबा मंदिरात जगप्रसिद्ध धुंगरी मेळा पाहायला तुम्ही जाऊ शकाल.

जून (June): जून महिन्यात एकही लाँग वीकेंड नाही.

जुलै (July):

पहिला - 10 जुलै शनिवार आणि 11 रविवार त्यानंतर 12 जुलैला सोमवारी रथयात्रेची सुट्टी आहे.

दुसरा - 17 जुलै शनिवार आणि 18 जुलै रविवार, 20 जुलै मंगळवारी बकरी ईद आहे. जर तुम्हाला 19 जुलैला सुट्टी मिळाली तर सलग 4 दिवसांची सुट्टी. या दिवसांत दिल्ली हाटमध्ये होणाऱ्या दिल्ली मँगो टुरिझम फेस्टिव्हलला तुम्ही जाऊ शकता.

ऑगस्ट (August):

28 ऑगस्ट शनिवार आणि 29 रविवार, त्यानंतर 30 ऑगस्टला सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीची सुट्टी असेल. पश्चिम घाटातलं हिल स्टेशन लोणावळा आणि गोवा ही मान्सूनमध्ये जाण्यासाठीची सर्वोत्तम ठिकाणं आहेत.

सप्टेंबर (September):

10 सप्टेंबर शुक्रवार गणेश चतुर्थी पुढे जोडून वीकेंड. उत्तरांचलमधील देहराडूनजवळच्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.

ऑक्टोबर (October):

15 ऑक्टोबर शुक्रवारी दसरा आला आहे आणि त्याला लागून 16, 17 वीकेंड आहे. आंतरराष्ट्रीय फोक फेस्टिव्हल, फूल यात्रा, कुल्लू फेअर आणि नयनादेवी यात्रा या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हिमाचल प्रदेशातील कुलूला जाऊ शकता.

नोव्हेंबर (November):

19 नोव्हेंबर शुक्रवारी गुरुनानक जयंती आहे, त्याला लागून 20-21 वीकेंड. कच्छमधल्या रण महोत्सवासाठी कच्छच्या रणात जाण्यासाठी हा काळ उत्तम आहे.

डिसेंबर (December):

24 डिसेंबरला शुक्रवारी रजा टाकलीत, तर 25 डिसेंबरला शनिवार, 26 डिसेंबरला रविवार त्यामुळे मोठी सुट्टी मिळू शकते. गोव्यातल्या प्रसिद्ध चर्चेसमध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करू शकता.

Published by: Karishma Bhurke
First published: January 17, 2021, 1:32 PM IST

ताज्या बातम्या