• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Long Life Foods: दीर्घायुष्य जगायचं असेल तर या गोष्टी खायला करा सुरुवात, वैज्ञानिकांचा दावा

Long Life Foods: दीर्घायुष्य जगायचं असेल तर या गोष्टी खायला करा सुरुवात, वैज्ञानिकांचा दावा

दीर्घायुष्याची (Long Life) इच्छा कोणाला नसते? परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळं व्यक्तीचं आयुष्य कमी होत जातं. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आपल्या आयुर्मानावर परिणाम होतो, हे अनेक अभ्यासात सिद्ध झालंय.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : दीर्घायुष्याची (Long Life) इच्छा कोणाला नसते? परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळं व्यक्तीचं आयुष्य कमी होत जातं. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आपल्या आयुर्मानावर परिणाम होतो, हे अनेक अभ्यासात सिद्ध झालंय. जर तुमच्या आहारात सकस पदार्थांचा समावेश केलात तर, नक्कीच चांगलं आणि दीर्घ आयुष्य मिळू शकेल, असं वैज्ञानिकांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ डॉ. जेम्स डिनिकोलाँटिनियो यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे, जे एखाद्या व्यक्तीला 100 वर्षांचं दीर्घायुष्य देऊ शकतात. कच्चा मध -  कच्च्या मधामध्ये असलेली पोषक तत्त्वं कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. नॅशनल लायब्ररी ऑफ हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, यकृत, कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगावर मध प्रभावी असल्याचं दिसून आलंय. अभ्यासानुसार, ट्यूमर आणि कर्करोग यांसारख्या पेशींसाठी मध अत्यंत सायटोटॉक्सिक (घातक विषारी) आहे, तर सामान्य पेशींसाठी नॉन-साइटोटॉक्सिक (कुठलाच धोका नाही) आहे. बकरीच्या दुधापासून बनवलेले केफिर (Kefir made from goat's milk) - कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. तुम्हाला माहीत आहे का, की शेळीच्या दुधापासून बनवलेल्या केफिरमध्ये असलेले प्रोबायोटिक्स आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि कर्करोगाच्या ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. अनेक टेस्ट ट्यूब संशोधनात ही बाब समोर आली आहे. जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, केफिरमुळे मानवांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचा धोका 56 टक्क्यांपर्यंत कमी होतो. डाळिंब - डाळिंब (Pomegranate for vitamins) A, C, E जीवनसत्त्वांचा आणि अनेक प्रकारच्या खनिजांचा चांगला स्रोत मानला जातो. डाळिंबात अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आढळतात. नेचर मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, डाळिंबातील माइटोकॉन्ड्रिया स्नायूंना कमकुवत होऊ देत नाही. दुसर्‍या अभ्यासानुसार, मायटोकॉन्ड्रियाचं बिघडलेलं कार्य पार्किन्सनसारख्या वृद्धत्वात होणाऱ्या आजारांना कारणीभूत ठरू शकतं, हे सिद्ध झालंय. हे वाचा - Covid 19: युरोपच्या वाटेवर भारत, लसीकरणाचा वेग मंदावला; वाढवली तिसऱ्या लाटेची शक्यता कच्चं केळं - तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हिरव्या केळ्यामध्ये एक प्रकारचं प्रोबायोटिक असतं, जे आपल्या पोटात असलेल्या निरोगी बॅक्टेरियांना अन्न पुरवतं. तसंच रक्तदाब कमी ठेवतं. अनेक अभ्यासांनुसार, हिरवी केळी खाल्ल्यानं किडनीच्या कर्करोगाचा धोकाही 50 टक्क्यांनी कमी होतो. हे वाचा - कोरोनामुळे चव गेली ती परत आलीच नाही, सडक्या अंड्यासारखी लागते चव आंबवलेलं अन्न - आंबवलेले पदार्थ आपला चयापचयाचा वेग बदलू शकतात, याचा पुरावा उपलब्ध आहे. याचा अर्थ ते तुमच्या पचनसंस्थेची क्षमता सुधारू शकते. त्यांच्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स, अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म वृद्धत्व आणि दीर्घायुष्याशी संबंधित जोखीम कमी करू शकतात. याशिवाय प्राण्यांची चरबी, बेरी, मशरूम, साल्मन फिश आणि अंडी खाल्ल्यानंही व्यक्तीचे आयुष्य वाढू शकतं.
  Published by:News18 Desk
  First published: