Home /News /lifestyle /

HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज; फक्त एक डोस घेऊन 2 महिने मिळणार संरक्षण

HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज; फक्त एक डोस घेऊन 2 महिने मिळणार संरक्षण

HIV चा धोका टाळण्यासाठी सध्या घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या तुलनेत हे औषध 89% अधिक प्रभावी ठरलं आहे.

    केपटाऊन, 12 नोव्हेंबर :  एचआयव्हीग्रस्त (HIV) जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना दुसऱ्या निरोगी जोडीदाराला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये म्हणून कंडोमचा वापर केला जातो किंवा काही गोळ्याही उपलब्ध आहेत. मात्र अशा परिस्थितीत महिलांना एचआयव्ही संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी गोळ्या देण्यापेक्षा दोन महिन्यांत एकदा औषधाचा डोस दिल्यास फायद्याचं ठरू शकतं असं एका संशोधनातून समोर आलं आहे. सध्या ट्रूवाडा या गोळ्या (Truvada pills)  जगभरात एड्सपासून संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. त्याऐवजी कॅबोटेग्रावीर (cabotegravir) हे औषध 89% अधिक प्रभावी ठरल्याचं या संशोधनात दिसून आले आहे. गोळ्या  आणि औषध एचआयव्हीपासून संरक्षण करतात पण त्यामध्ये कॅबोटेग्रावीर हे औषध 89% अधिक प्रभावी ठरलं आहे. एपीच्या रिपोर्टनुसार आफ्रिका खंडातील सात देशांमधील 3,200  जणांनी या संशोधनात सहभाग नोंदवला होता. यामध्ये दोन महिन्यांनी शॉट्स घेण्याचा आणि दररोज ट्रूवाडा गोळ्या घेण्यास सांगितलं होतं.  1.79% महिलांमध्ये दररोज गोळ्या घेतल्यानंतर देखील HIV दिसला होता तर शॉटस घेणाऱ्या केवळ 0.21% महिलांमध्ये HIV दिसला होता. त्याचबरोबर दररोज गोळ्या घेतल्यानं त्याचे साईड इफेक्ट देखील दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मळमळ ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. हे वाचा - संपूर्ण जगासाठी संकट पण तिच्यासाठी वरदान ठरला कोरोना; संपूर्ण आयुष्यच बदललं कॅबोटेग्रावीर हे औषध ViiV हेल्थकेअरनं विकसित केलं असून ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांच्यासह फायझर आयएनसी आणि शिओनोगी लिमिटेड या कंपन्यांकडे या औषधाचे मालकी हक्क आहेत. अमेरिकेची राष्ट्रीय आरोग्य संस्था बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि ViiV यांनी या संशोधनाला आर्थिक पाठबळ दिलं आहे. तर या संशोधनासाठी औषधं हे ट्रूवाडा तयार करणारी कंपनी गिलिड सायन्सेस आणि ViiV यांनी पुरवली होती. जगातील काही भागात पुरुषांपेक्षा एचआयव्ही होण्याची शक्यता तरुण स्त्रियांमध्ये  दुप्पट असल्याचं मत दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील विटवॅट्रस्रँड विद्यापीठातील सिनेड डेलानी-मोरेत्लवे यांनी व्यक्त केलं आहे. जगातील तरुणींना या औषधाची अधिक गरज असून ते त्यांना फायदेशीर ठरत आहे. ViiV चे डेबोराह वॉटरहाऊस याविषयी म्हणाले, संभोगावेळी पार्टनरला कंडोम वापरायला सांगण्याऐवजी एड्सपासून बचाव करण्यासाठी वेगळा पर्याय असावा असं त्या महिलांना वाटतं. हे वाचा - संपूर्ण जगासाठी संकट पण तिच्यासाठी वरदान ठरला कोरोना; संपूर्ण आयुष्यच बदललं एड्सपासून बचावाची औषधं परवडणाऱ्या किमतींत उपलब्ध करून देणं आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे. लोकांना एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी पर्याय हवे आहेत आणि नव्या औषधामुळे तो उपलब्ध होणार आहे, असं एव्हीएसी या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख मिशेल वॉरन यांनी सांगितलं.  काँडोममुळे एचआयव्हीसोबतच इतर लैंगिक आजारांपासूनही संरक्षण होतं त्यामुळे तो वापरण्याचा सल्ला कायम दिला जातो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Serious diseases

    पुढील बातम्या