मुंबई, 17 डिसेंबर - एकटेपणाकडे (loneliness) कायमच नकारात्मक पद्धतीनं पाहिलं जातं. मात्र एकटं असण्याचा एक फायदा वाचून नक्कीच तुमच्या भुवया उंचावतील. एका नव्या संशोधनातून एकटेपणाबाबत एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे.
एका नव्या संशोधनानुसार (research), मेंदूतील (brain) कल्पकतेशी जोडलेल्या संरचनांची वाढ होण्यास एकटेपणाची मदत होते. 'सीएनएन'नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यातून समोर आलं, की एकट्या माणसांच्या मेंदूत भुतकाळातल्या गोष्टींची आठवण करून देणाऱ्या भागांमधील हालचाल अधिक वेगानं होते. 'नेचर कम्युनिकेशन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, विचार करणे आणि इतरांबाबात नियोजन करणे यासंदर्भानंही त्यांचा मेंदू अधिक विकसीत होतो.
या अभ्यासाच्या प्रमुख नॅथन स्प्रेंग सांगताता, "आम्हाला सर्वाधिक आश्चर्य याचं वाटलं, की एकाकी व्यक्तींच्या मेंदूतले स्मृती, कल्पकता आणि इतरांसाठीचं नियोजन याच्याशी जोडलेले भाग अधिक बळकट झााले, तर इतर लोकांपेक्षा एकट्या नसलेल्या या लोकांच्या मेंदूत ग्रे मॅटरचा भागही वाढलेला होता. सततच्या एकटेपणातूनच हे घडल्याचं संशोधनातून समोर आलं.
40 ते 69 या वयोगटातील 40 हजार लोकांच्या ब्रेन इमेजेसचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला गेला. युके बायोबॅंकच्या साहाय्याने हे केलं गेलं. सहभागी लोकांना 'तुम्हाला एकटं वाटतं का नाही?' यासह अनेक प्रश्न विचारले गेले.
करोनाच्या काळाच्या आधी काही काळापूर्वी तर एकटेपण अजूनच चिंतेची बाब म्हणून समोर आलं होतं. विशेषत: 2018 साली युनायटेड किंग्डममध्ये तर लोनलीनेस मिनिस्टरची नियुक्ती केली गेली.