मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एकट्या महिलांचं आरोग्य धोक्यात; गंभीर आजार घालतायेत विळखा

एकट्या महिलांचं आरोग्य धोक्यात; गंभीर आजार घालतायेत विळखा

एकटेपणा आणि समाजापासून दूर राहिल्यानं महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर अगदी विरुद्ध परिणाम होत असल्याचं संशोधनात दिसून आलं.

एकटेपणा आणि समाजापासून दूर राहिल्यानं महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर अगदी विरुद्ध परिणाम होत असल्याचं संशोधनात दिसून आलं.

एकटेपणा आणि समाजापासून दूर राहिल्यानं महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर अगदी विरुद्ध परिणाम होत असल्याचं संशोधनात दिसून आलं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 01 नोव्हेंबर : सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) आपल्या जवळच्या व्यक्ती दूर झाल्या आहेत. काही कारणांमुळे एकमेकांना भेटता येत नाही आहे. शिवाय अनेक जण एकटे पडले आहेत. कोरोना संक्रमणामुळे जास्तीत जास्त लोकांमध्येही जाता येत नाही. त्यामुळे एकटेपणा (loneliness) आणि सामाजिक विलगीकरण (social isolation) वाढू लागलं आहे. मुळात जे लोक आधीपासूनच एकटे आहेत, त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो याचा संशोधकांनी अभ्यास केला. पुरुष आणि महिलांची तुलना केली असता दोघांमध्येही याचा विरुद्ध परिणाम दिसला. एकटं आणि समाजापासून दूर महिलांचं आरोग्य धोक्यात आहे. तर पुरुषांच्या आरोग्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असं संशोधकांना दिसलं.

एकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब आणि हायपरटेन्शन वाढत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. समाजापासून दूर राहणाऱ्या मध्यमवयीन आणि ज्येष्ठ महिलांना हायपरटेन्शन होण्याचा अधिक धोका असून त्यामुळे त्यांना हृदयविकार आणि पक्षाघाताची शक्यता अधिक असते. ब्रिटिश कोलंबियातील संशोधकांनी केलेलं हे संशोधन जर्नल ऑफ हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

संशोधकांनी Canadian Longitudinal Study मधील डेटा वापरला. यामध्ये त्यांना आढळून आलं ज्या महिला एकट्या राहात आहेत, त्या महिन्यातून तीनहून कमी वेळा सामाजिक उपक्रमात सहभागी होतात किंवा ज्या महिलांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 85 पेक्षा कमी लोकांची नावं आहेत त्यांना हायपरटेन्शनची समस्या होऊ शकते.

हे वाचा - SOCIAL MEDIA वर कनेक्ट तरी एकटं वाटतंय; मानसिक आरोग्य धोक्यात असण्याचे संकेत

मुख्यत्वे विधवा, एकट्या राहणाऱ्या महिला आणि सामाजिक जीवनात कमी वावरणाऱ्या महिलांचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अधिक आढळून आलं. विवाहित महिलांच्या तुलनेत विधवांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक आढळून आली आहे. याचबरोबर विधवा महिलांमध्ये सर्व वयोगटात हायपरटेन्शन आढळून आलं आहे. त्याच तुलनेत पुरुषांचा विचार करायचा झाल्यास त्यांच्यात पूर्णपणे विरुद्ध स्थिती आहे. यामध्ये जास्त लोकांमध्ये राहणाऱ्या पुरुषाला उच्च रक्तदाब आढळून आला. तर एकटा असणारा आणि कमी सामाजिक संपर्क असणाऱ्या पुरुषामध्ये कमी रक्तदाब आढळून आला आहे.

यूबीसी येथील  औषधनिर्माणशास्त्रातील सहाय्यक प्राध्यापक अन्नालिजन कॉन्क्लिन यांनी सांगितलं, सामाजिक विलगीकरणात राहणाऱ्या महिलांमध्ये सामान्यत: सोडियमचं प्रमाण जास्त असतं आणि त्या लठ्ठपणामुळे ग्रस्त असतात तर कमी सामाजिक संबंध असलेल्या पुरुषांना लठ्ठपणाचा त्रास कमी जाणवतो.

हे वाचा - मानसिक आजार असलेल्यांना COVID-19 चा धोका; बळावतोय गंभीर कोरोना

कोव्हिड - 19 च्या काळात  एकट्या राहणाऱ्या महिलांची अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं संशोधकांनी सांगितलं. यामुळे हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब तसंच हृदयासंबंधी विकार कमी होण्याची शक्यता आहे. तसंच उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराबरोबरच व्यायाम आणि सामाजिक जीवनातील सहभाग देखील एकटं राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असल्याचं या संशोधनात सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Health, Woman