तथाकथित 'विजोड' जोडप्याला लोकांच्या चौकश्यांनी केलं इतकं हैराण, की दोघांनी बरोबर जाणं सोडलं

तथाकथित 'विजोड' जोडप्याला लोकांच्या चौकश्यांनी केलं इतकं हैराण, की दोघांनी बरोबर जाणं सोडलं

प्रेमी जोडप्यांना लोक नेहमीच भोचक प्रश्न विचारत असतात. या जोडप्याला तर हा त्रास जास्तच होतो.

  • Share this:

लंडन, 28 मार्च : असं म्हणलं जातं, की जोड्या वरूनच बनवून पाठवल्या जातात. मात्र अनेकजण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्यांना ही बाब मान्यच नसते. (London news of couple) जोडप्याला एकमेकांना अनुरूप असल्याचं पटलेलं असलं तरी समाजाला ते बऱ्याचदा विजोड वाटतं. अर्थात, समाज अनेकदा अशा जोड्या स्वीकारत नाही. अशा जोडप्यांना मग त्यावरून अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. असंच एका जोडप्यासोबत झालं आहे. बाह्यरूपावरून सो कॉल्ड विजोड वाटणाऱ्या या जोडप्याचं नॉर्मल जगणंच लोकांच्या टोमण्यांमुळे अशक्य झालं आहे.

निवडीचे पारंपरिक निकष बाजूला सारत त्या दोघांनी मनपसंत जोडीदार निवडला. मात्र लोक आता त्यांना टोमणे मारत आहेत. (couple from London questioned over girlfriend height)

या व्यक्तीची उंची आहे 5 फूट 6 इंच. आणि त्याच्या गर्लफ्रेंडची उंची 6 फुटांहूनही जास्त आहे. आता हे दोघे एकमेकांवर प्रेम तर खूप करतात. मात्र संकुचित विचारांचे लोक हे मान्यच करत नाहीत. याच कारणानं हे जोडपं अगदी शॉपिंग करायलाही रात्रीच घराबाहेर निघतं. (girlfriend annoyed as people question about height)

या व्यक्तीच्या प्रेयसीला हे अजिबातच आवडत नाही. लोकांनी आपल्या नात्याविषयी काहीबाही बोलावं हे तिला पसंत नाही. लंडनमध्ये राहणारी वेनेसा ही मार्फन सिंड्रोमनं पीडित आहे. यामुळे तिची उंची खूप वाढली आहे. वेनेसा सांगते आहे, की तिचा बॉयफ्रेंड डॅनियल ब्राऊन आणि तिच्या उंचीत इतकं जास्त अंतर आहे, की लोक सतत दोघांकडे टक लावून पाहतात. हे त्यांच्या नात्यासाठी चांगलं नाही. (London couple avoids shopping at day)

हेही वाचा वधूचा लग्नसोहळ्यातील ड्रेस वेळेवर न देणं टेलरला पडलं महागात, प्रकरण गेलं कोर्टात

वेनेसा सांगते, की 'लोक सतत मला हेच विचारतात, की मी याच्यासोबत का राहते? मी एखाद्या उंच माणसासोबत राहिलं पाहिजे.'  डॅनियल म्हणतो, की लोकांच्या तुच्छ कमेंटमुळं आमच्या नात्याला इजा पोचते. यामुळं आम्ही दिवसा डेटिंगवरही जात नाही. शिवाय शॉपिंगलाही रात्री जातो. असं असलं तरी लोकांच्या बडबडीमुळं आमच्या प्रेमाला धक्का पोचलेला नाही. ते अबाधित आहे.

हेही वाचा जीव घेणाऱ्या जंगलाच्या राजाची जीव वाचवण्यासाठी धडपड; सिंहाचा थक्क करणारा VIDEO

वेनेसा म्हणते, की मी यामुळं स्वतःचा वैताग करून घेणं टाळते. मात्र लोक ऐकतच नाहीत. लोकांना केवळ याच विषयावर बोलायचं असतं. सांगतात, की मी मॉडेलिंगच्या जगात असायला हवं होतं. त्यांना हे माहीत नाही माझ्या उंच असण्याला माझा आजार कारणीभूत आहे. माझ्या शरीराच्या आत काय चाललं आहे हे केवळ मलाच कळू शकतं.

Published by: News18 Desk
First published: March 27, 2021, 9:57 PM IST

ताज्या बातम्या