कंडोम घोटाळा! पोलिसांनी मारलेल्या छाप्यात मिळाले 1 लाख नकली कंडोम

सेक्स करताना तुम्ही वापरत असलेले कंडोम नकली तर नाही ना, याची काळजी घ्या.

  • Share this:

लंडन, 12 फेब्रुवारी : कंडोम ही कुटुंब नियोजनासाठीची एक उत्कृष्ट पद्धत आहे, परंतु काहीवेळा असुरक्षित, कालबाह्य आणि खराब कंडोममुळे लैंगिक आजारही होतात. आश्चर्यकारक म्हणजे युनायटेड किंगडमने गेल्या दोन वर्षात हजारो बनावट, असुरक्षित कंडोम पकडले आहेत.

यूकेच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) 2018 ते 2019 दरम्यान देशभरात सुमारे 1 लाख बनावट कंडोम जप्त केले आहेत. त्यापैकी 87,500 कंडोम एकाच छाप्यात सापडले. एवढा मोठा साठा पाहून अधिकारीही चकित झाले. पोलिसांनी जप्त केलेले कंडोम बनावट स्वरुपाचे असल्याचे समोर आले आहे. तर, हजारो कंडोमची एक्सपायरी डेट उलटून गेलेले होते.

वाचा-तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही आहात सर्वात स्पेशल, कसं ओळखाल त्याच्या मनातलं?

वाचा-Loose motion ने हैराण, पोट खराब झाल्यावर 'हे' पदार्थ खा

वाचा-महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण

वाचा-Kiss नव्हे हा तर ‘कोरोना’चा दंश, Kiss Day ला राहा सावध !

ब्रॅडफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक महेंद्र पटेल यांनी, एमएचआरएने जप्त केलेले कंडोम अत्यंत असुरक्षित आहेत. बरेच लोक अशा बनावट कंडोमचा अवैध व्यापार करतात. यामुळे, बर्‍याच वेळा असे कंडोम बाजारात येतात जे सुरक्षेसाठी चांगले नसतात, असे सांगितले. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, सध्या कंडोम हे नैसर्गिक रबरपासून तयार केले जातात. बनावट कंडोम असुरक्षितपणे नैसर्गिकरित्या तयार केल्या जातात. अशामुळं लैंगिक आजारही होऊ शकतात.

एमएचआरएने छाप्यात अवैध कंडोम, वैद्यकीय उपकरणे पकडली. ज्यांची किंमत जवळजवळ 19.39 कोटींपेक्षा जास्त आहे. एमएचआरएने त्यास ऑपरेशन पंगेया असे नाव दिले. 2018 ते 2019 दरम्यान अशा अवैध धंदा करणार्‍या 859 लोकांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2020 10:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading