मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रोमान्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे शहर; चीटिंगबाबतही इथलेच लोक अग्रेसर

रोमान्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे शहर; चीटिंगबाबतही इथलेच लोक अग्रेसर

या सर्व्हेच्या माध्यमातून जगातील सर्वात रोमँटिक शहर (Most Seductive Cities of the world) शोधून काढलं आहे. यात जगातील कोणत्या शहरातील लोक रोमान्सच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात, हे सर्वांत पहिल्यांदा शोधण्यात आलं.

या सर्व्हेच्या माध्यमातून जगातील सर्वात रोमँटिक शहर (Most Seductive Cities of the world) शोधून काढलं आहे. यात जगातील कोणत्या शहरातील लोक रोमान्सच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात, हे सर्वांत पहिल्यांदा शोधण्यात आलं.

या सर्व्हेच्या माध्यमातून जगातील सर्वात रोमँटिक शहर (Most Seductive Cities of the world) शोधून काढलं आहे. यात जगातील कोणत्या शहरातील लोक रोमान्सच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात, हे सर्वांत पहिल्यांदा शोधण्यात आलं.

  नवी दिल्ली 19 मार्च : जगभरातील अनेक प्रसिद्ध शहरांबाबत आपल्या मनात कुतूहल असतं. कारण, प्रत्येक शहराचं स्वतःचं असं एक वेगळेपण असतं. शहरांतील लोकजीवनामध्ये आपल्याला संबंधित देशांच्या संस्कृतीची (Culture) आणि परंपरेची (Traditions) झलक अगदी सहज दिसते. काही शहरांमध्ये अगदी साधी माणसं भेटतात तर काही ठिकाणी एकदम हुशार माणसं भेटतात. एखाद्या शहरामध्ये तुम्हाला अतिशय चांगलं आदरातिथ्य (Hospitality) करणारी माणसं भेटतील तर एखाद्या शहरातील लोक एकदमच माणुसकी नसलेले असतील.

  नुकतंच इंग्लंडमधील (England) 'द बॉटल क्लब'नं (The Bottle Club) जगभरातील प्रसिद्ध आणि प्रमुख शहरांचा सर्व्हे केला. ही शहरं रोमान्सच्या (Romance) बाबतीत कशी आहेत, हे या सर्व्हेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व्हेच्या माध्यमातून 'द बॉटल क्लब'नं जगातील सर्वात रोमँटिक शहर (Most Seductive Cities of the world) शोधून काढलं आहे.

  आयुष्याचं वाटोळं व्हायला या 3 गोष्टीसुद्धा पुरेशा; वेळ गेल्यानंतर अनेकांना कळतं

  या सर्व्हेमध्ये, जगातील कोणत्या शहरातील लोक रोमान्सच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात, हे सर्वांत पहिल्यांदा शोधण्यात आलं. जगातील सर्वांत जास्त रोमँटिक (Romantic) आणि सेडक्टिव्ह (Seductive) म्हणजे रोमान्ससाठी उद्युक्त करणाऱ्या शहरांच्या यादीत इंग्लंडची राजधानी लंडननं पहिला क्रमांक मिळवला आहे. डेली स्टारच्या अहवालानुसार, द बॉटल क्लबनं केलेल्या सर्व्हेमध्ये लंडनला 80 पैकी 72.2 गुण मिळाले आहेत. त्यामुळे लंडनला जगातील सर्वात जास्त सेडक्टिव्ह शहर (Seductive City) होण्याचा मान मिळाला आहे.

  येथील एक लाखांहून अधिक लोकांनी विविध पॉर्न साइट्सवर (Porn Sites) आपली अकाउंट्स बनवलेली आहेत. लंडनमध्ये 131 अ‍ॅडल्ट इव्हेंट्स (Adult Events) होतात. याशिवाय तेथील 10 हजारांहून अधिक लोक, ओन्ली फॅन्स (OnlyFans) या अ‍ॅडल्ट सब्सक्रिप्शन साइटवरून पैसे कमवतात. सेडक्टिव्ह शहरांच्या यादीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेतील लास वेगास (Las Vegas) आणि न्यूयॉर्क (New York) ही शहरं आहेत. लास वेगासला 67.6 गुण मिळाले आहेत, तर न्यूयॉर्कला 66.5 गुण मिळाले आहेत.

  रोमान्सच्या बाबतीत लंडनच अग्रेसर

  या सर्व्हेक्षणातील दुसरा विभाग म्हणजे विचित्र पद्धतीनी रोमान्स (Kinkiest Cities of the World) करणाऱ्या व्यक्तींचा. या बाबतीतही लंडन शहर सर्वोच्च स्थानी आहे. या सर्व्हेनुसार, येथील लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या सेक्स फँटसीज् (Fantasies) आणि इच्छा पूर्ण करतात. या कॅटेगरीमध्ये लंडनला 40 पैकी 39 गुण मिळाले आहेत. 38 गुणांसह अमेरिकेतील लास वेगास शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर्मनीची राजधानी बर्लिनचा (Berlin) क्रमांक लागतो. बर्लिनला 32.5 गुण मिळाले आहेत.

  आता फिल्ममधील 'मिस्टर इंडिया'सारखे तुम्ही खरोखर होऊ शकता गायब; कसं ते पाहा VIDEO

  नात्यामध्ये फसवणूक करण्यातही लंडन आघाडीवर

  द बॉटल क्लबच्या सर्व्हेमध्ये यूकेतील सर्वांत जास्त फसवणूक (Cheating) करणाऱ्या शहरांबद्दलही माहिती घेण्यात आली. त्यानुसार, एकमेकांची फसवणूक करण्यातदेखील लंडन शहर आघाडीवर आहे. येथील कपल्स एकमेकांची सर्वाधिक फसवणूक करतात. कमिटेड रिलेशनशिपमध्ये (Committed Relationship) असूनही ते अनेक अफेअर करतात. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम (Birmingham) आणि नॉटिंगहॅम (Nottingham) या शहरांनी या यादीमध्ये अनुक्रमे दुसरं व तिसरं स्थान मिळवलं आहे. इलिसीट एन्काउंटर्स (Illicit Encounters) नावाच्या वेबसाइटनुसार, लंडनमधील 75 लाख लोकसंख्येपैकी एक लाखांहून अधिक लोकांचं अफेअर (Affair) आहे.

  एकूणच रिलेशनशीपमधील रोमान्स, सेडक्टिव्हनेस आणि चीटिंग या गोष्टींबाबत लंडन हे शहर आघाडीवर आहे.

  First published:

  Tags: Love story, Romance