कॅन्सर होण्याआधी शरीर देतं हे पाच संकेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं का?

या रोगावरील उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे भारतातील अनेक गरिब रुग्ण उपचार न घेताच मरणाला जवळ करतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 02:59 PM IST

कॅन्सर होण्याआधी शरीर देतं हे पाच संकेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं का?

कर्करोगामुळे भारतात वर्षभरात हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत. कर्करोगामुळे मृत्यू होण्याचं मूळ कारण म्हणजे हा रोग झाल्याचं फार उशीरा कळतं. त्यामुळे त्यावर उपचारही उशीराने सुरू होतात. जर हा आजार वेळीच कळला तर अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात.

याशिवाय या रोगावरील उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे भारतातील अनेक गरिब रुग्ण उपचार न घेताच मरणाला जवळ करतात. जर कर्करोगापासून स्वतःला वाचवायचं असेल तर प्राथमिक पातळीवरच याबद्दल कळणं अत्यंत आवश्यक आहे.

सतत श्वास लागणं- अनेकदा असं होतं की थकवा नसतानाही श्वास फुलतो. जर तुमच्यासोबत असं काही होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण सर्वसामान्यपणे धावण्याने किंवा जलद चालण्यानेच श्वास फुलतो.

भूक कमी लागणं- पचन प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे भूक कमी लागते. जर तुम्हाला पचनक्रियेशी संबंधीत काही समस्या असतील आणि तुम्हाला भूक लागत नसेल तर काही दिवसांमध्ये ठीक होतं. मात्र अनेक दिवस जर हा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. हे कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक असू शकतं.

सतत रक्तस्त्राव होणं- तुम्हाला शौचाच्या मार्गातून किंवा खोकताना किंवा थूंकताना रक्तस्त्राव होत असेल तर तातडीने सावध व्हा. या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांना याबद्दल सांगा. हे लक्षण कर्करोगाचं नसलं तरी शरीरात बिघाड झाल्याचं हे लक्षण आहे.

Loading...

जखम भरून न निघणं- मधुमेहाच्या रुग्णांना एखादी इजा झाली तर ती जखम लवकर भरून निघत नाही. पण जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास नाही आणि जखम झाल्यावर ती लवकर बरी होत नसेल तर डॉक्टरांशी त्वरीत संपर्क करावा. कर्करोगाच्या अनेक लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे.

अनेक महिने सर्दी- खोकला असणं- वातावरणातील बदलांमुळे सर्दी- खोकला होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पण तीन महिन्यांहून अधिक काळ जर सर्दी- खोकला राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासणी करून घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...