योग्यवेळी 'नाही' म्हणण्याचं धाडस तुम्ही दाखवायलाच हवं

संकोचामुळे आणि एखाद्या अनामिक भीतीमुळे तुम्ही 'नाही' म्हणू शकत नाही. यामागची कारणे समजून घेतली तर नकार कसा द्यायचा याचा विचार तुम्हाला करता येईल.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 05:03 PM IST

योग्यवेळी 'नाही' म्हणण्याचं धाडस तुम्ही दाखवायलाच हवं

मुंबई, 14 जून : बरेचदा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं असतं, पण मनाला पडलेलं हे कोडं सोडवताना आपण 'हो' म्हणून मोकळ होतो. नाही म्हटल्याने आपण काहीतरी गमावून बसू, अशी भीती आपल्याला वाटत असते. मनात नसतानाही 'हो' म्हणण्यामागे आपला हेतू चांगला असतो, पण तो दरवेळी साद्य होतोच असं नाही. 'नाही' कसं म्हणायचं? कोणत्या पद्धतीने म्हणायचं? अशा अनेक प्रश्नांचा गोधळ आपल्या मनात सुरू असतो. योग्यवेळी 'नाही' म्हणण्याचं धाडस कसं दाखवायचं यासंदर्भातल्या काही उपयुक्त टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बँकेत गेल्यानंतर कुणीतरी हमखास आपल्याला पेन मागतो. बँकेचे व्यवहार उरकून आपल्याला कामावर जायचं असतं. पण पेन दिल्यामुळे आपला खोळंबा होतो. बँकेतल्या व्यवहाराऐवजी पेन कधी परत मिळेल याकडेच आपलं लक्ष लागून राहतं. ''बँकेत येताना पेन बरोबर ठेवणं आवश्यक आहे, ही साधी गोष्टसुद्धा कळत नाही का?'' असं त्या व्यक्तीला खडसावून विचारावसं वाटतं. हे सगळ्या गोष्टी बाजूला सारत आपण मनात नसतानाही त्या व्यक्तीला पेन देतो.

तुम्ही वारंवार तुमचा स्मार्टफोनमध्ये डोकावता का? लगेच सोडा ही सवय, कारण..

अशाच पद्धतीने कधी आपला शेजारी बाइक किंवा कार मागतो. परत देताना त्यात पुरेसं पेट्रोल भरतोच असं होत नाही. तरीसुद्धा अशा परिस्थिती तुम्ही त्याला हो म्हणता. बरेचदा मित्र, नातेवाईक, ऑफिसमध्ये बॉस, आणि प्रेमाची व्यक्तीचासुद्धा असाच अनुभव येतो. पण अशावेळीसुद्धा त्यांना 'नाही' म्हणायला तुमचं मन धजावत नाही आणि त्याचे गंभीर दुष्परिणाण तुम्हाला भोगावे लागतात.

संकोचामुळे आणि एखाद्या अनामिक भीतीमुळे तुम्ही 'नाही' म्हणू शकत नाही. यामागची कारणे समजून घेतली तर नकार कसा द्यायचा याचा विचार तुम्हाला करता येईल. मित्र, बॉस, सहकारी आणि नातेवाईकांना नाराज करायचं नसतं म्हणून आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. बरेचदा चांगुलपणा मिळावा म्हणून आपण 'हो' म्हणत असतो. आपल्या विरोधात कुणी जाऊ नये असं देखील आपल्याला वाटत असतं. बरेचदा 'नाही' म्हटलं तर आपण स्वार्थी ठरू अशी भीती आपल्या मनात असते. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या डोक्याचा भुगा झालेला असतो.

Loading...

नोकरीसाठी पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला जाताय? मग 'या' 5 टिप्स एकदा वाचा

एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे हो म्हणत राहिल्याने चांगुलपणा मिळतोच असं नाही. बरेचदा हो म्हणून तुम्ही तणाव ओढवून घेता. यात तुमचा वेळ, पैसा आणि उर्जा विनाकारण वाया घालवता. या तिन्ही गोष्टी सत्कारणी लागाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही योग्यवेळी नाही म्हणण्याचं धाडस दाखवायलाच हवं. त्यासाठी रोजच्या वापरातील कौशल्यांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. नकार देऊनही चांगुलपणा मिळवणं हे एक कौशल्यच असतं, ते अनुभवातून शिकावं लागतं. या कौशल्याचा वापर दररोज करावाच लागतो. ज्याला योग्यवेळी 'नाही' म्हणता येतं त्यांच्या 'हो' म्हणण्याला अर्थ असतो हे तत्व प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं.

एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तर तसं स्पष्टपणे सांगा. ते सांगताना अपराधीपणाची भावना मनात ठेवू नका. त्यासाठी माफी मागण्याची तर अजिबात गरज नाही. तुम्ही दुबळे, भाबडे आहात असं तुमच्या सहवासात असणाऱ्यांना अजिबात वाटता कामा नये. एखाद्या व्यक्तीच्या या कमतरता जर लोकांच्या लक्षात आल्या तर त्याच्याकडून हवी ती कामे ते करून घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...