Elec-widget

Latest Fashion : इन्फॉर्मल सॉक्स घालण्याची क्रेझ वाढली; ठरतेय 'स्टाईल स्टेटमेंट'

Latest Fashion : इन्फॉर्मल सॉक्स घालण्याची क्रेझ वाढली; ठरतेय 'स्टाईल स्टेटमेंट'

पूर्वी फक्त फॉमर्ल शूजबरोबर घातले जाणारे सॉक्स आता इन्फॉर्मल झाले असून, फॅशन जगतालासुद्धा याची दखल घेणं भाग पडलं आहे

  • Share this:

मुंबई, 12 जून : पूर्वी फक्त फॉमर्ल शूजबरोबर वापरले जाणारे सॉक्स (मोजे) आता इन्फॉर्मल झाले आहेत. Latest Fashionच्या या युगात फक्त तरुण मंडळीच नव्हे तर लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण सॉक्स वापरताहेत. पूर्वी फक्त हिवाळ्यात घातल्या जाणाऱ्या या गोष्टीपासून तरुण मंडळी उन्हाळ्यात हातभर लांब असायची. मात्र, आता पूर्वीसारखं चित्र राहिलेलं नाही. पायांचं संरक्षण करण्यासाठी आता सर्सास सगळेजण मोजे वापरू लागले आहेत. अगदी फॅशन जगतालासुद्धा याची दखल घेणं भाग पडलं आहे.

कुठल्याही स्कीन टोनवर शोभून दिसतात 'हे' रंग

आजकाल अनेकजण फॉर्मल्स घालायचं टाळतात. त्यामुळे चप्पलसुद्धा फॉर्मल घातलीच जाते असं होत नाही. पण उन किंवा इतर गोष्टींपासून पायांचं संरक्षण करण्यासाठी चपला, सँडल्स किंवा किटोजवरसुद्धा सॉक्स घालण्याचा ट्रेन्ड आला आहे. पाय टॅन होऊ नयेत म्हणून घातले जाणारे सॉक्स चांगले दिसतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे घातले जाऊ लागले आहेत. रंगीबेरंगी आणि बजेटमध्ये बसणारे हे मोजे फॅशन स्ट्रीटवरून तुम्हाला अगदी पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत खरेदी करता येतात.


जीन्स नवी कोरी दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर वाचा ‘या’ टिप्स

Loading...

तरुणाईल जास्त क्रेझ

प्लेन सॉक्सऐवजी नक्षीदार आणि रंगीबेरंगी सॉक्स घालण्याकेड तरुणाईचा जास्त कल आहे. मुलींमध्ये याची जास्त क्रेझ आहे. नेहमी वापरल्या जाणाऱ्या काळ्या, पांढऱ्या रंगाऐवजी गुलाबी, हलका पिवळा, हलका निळा अशा रंगाची क्रेझ मुलींमध्ये जास्त दिसून येते. यांत वेगवेगळे डिझाईन आणि कार्टून्स असलेल्या सॉक्सना जास्त पसंती दिली जाते.

फक्त मुलीच नव्हे तर मुलंसुद्धा आता हौसेनं हा ट्रेन्ड मिरवताहेत. तरुणांमध्ये जास्त क्रेझ असल्यामुळे पूर्वी बुटांच्या आडून डोकावणारे मोजे आता वेगवेगळ्या आकार आणि प्रकारात घातले जात आहेत. अगदी किटोजवरही मिरवू लगले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...