विचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास

विचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास

जेव्हा तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचे विचार प्रकट होतात, तेव्हा लोकं तुमची पारख करतात

  • Share this:

मुंबई, 16 जून - तुम्ही कसे दिसता, तुमचा पेहराव किंवा कुढल्या ब्रँडचे शूज घालता यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचार कसा करता यावरून तुमचा आत्मविश्वास अलंबून असोत. त्यामुळे जेव्हा तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचे विचार प्रकट होतात, तेव्हा लोकं तुमची पारख करतात.

जन्माला आलेली प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण असतं. त्यामुळेच या जगातली प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत प्रत्येकजण आपापल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर एका विशिष्ठ पातळी गाठण्याचा प्रतयत्न करत असतो. बुद्धीमत्ता आणि कष्टाळू वृत्ती या दोन बलस्थानांमुळे तुम्ही यशाची एक एक पायरी वर चढत जाता.

लोकांना स्वभाव ओळखण्यासाठी फायद्याच्या ठरतील तुम्हाला 'या' 5 टिप्स

जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. प्रत्येकात निसर्गतः काहीतरी वेगळेपण असल्यामुळे सुंदरतेला वाव आहे. रंग, उंची ही सगळी परिमाणं मानवनिर्मित असतात. त्यामुळे दिसण्यापेक्षा तुमच्या असण जास्त महत्त्वाचं ठरतं.

तुमचं वागणं, बोलणं, भाषा, तुमची देहबोली आणि चेहऱ्यावरलं स्मितहास्य या सगळ्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास कारणीभू ठरतात. यामुळे तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा.

करिअर घडवायचं असेल तर आधी करा 'ही' महत्त्वाची गोष्ट

आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता, कुठल्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता या गोष्टी विकासीत करता येतात यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि हा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला विचारांची प्रगल्भता वाढवाली लागेल.

 

First published: June 16, 2019, 4:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या