ऐतिहासिक वस्तू जतन करण्याची आवड असेल, तर 'या' विषयात होता येईल तुम्हाला पारंगत

संग्रहालय प्रत्यक्षात उभं करण्याचं एक विशिष्ट शास्त्र आहे, तंत्र आहे. ज्याला 'म्युझिऑलॉजी' असं म्हटलं जातं

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 06:11 PM IST

ऐतिहासिक वस्तू जतन करण्याची आवड असेल, तर 'या' विषयात होता येईल तुम्हाला पारंगत

मुंबई, 18 जून : संग्रहालयात ठेवलेल्या पुरातन किंवा ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करतात. भरपूर शुक्ल आकारून तिथे पर्यटकांना प्रवेश दिला जातो. संग्रहालयासाठी आवश्यक वस्तूंचा संग्रह करणे आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पर्यटक म्हणून पाहणं आणि ते संग्रहालय उभ करणं दोन गोष्टींमध्ये जमीन आकाशाचा फरक आहे. संग्रहालय प्रत्यक्षात उभं करण्याचं एक विशिष्ट शास्त्र आहे, तंत्र आहे. ज्याला 'म्युझिऑलॉजी' असं म्हटलं जातं. या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ठ अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

म्युझिऑलॉजीमध्ये काय शिकवलं जातं - हाती आलेल्या वस्तूचं ऐतिहासिक महत्त्व जाणण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. जगाचा, देशाचा, प्रदेशाचा आणि गावाचा इतिहास या शाखेत शिकविला जातो. जुन्या काळातील वस्तूंची योग् ती पारख करणं, जुन्या आणि कालबाह्य झालेल्या भाषां जसेकी मोडी लिपी, पांडू लिपी यांसारख्या भाषा या अभ्यासक्रमात शिकविल्या जातात. मांडणीचं शास्रसुद्धा म्युझिऑलॉजीमध्ये शिकवलं जातं.

मुलींसाठी सर्वात जास्त संधी असलेली 'ही' आहेत 5 क्षेत्र

शिक्षण संस्था - कोलकाता विद्यापाठ आणि उत्तर प्रदेशातील अलिगढचे मुस्लीम विद्यापीठ तसंच दिल्लीतील नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट मध्ये म्युझिऑलॉजीचं शिक्षण दिलं जातं. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात एम.एस्सी इन म्युझिऑलॉजी असा आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर वनस्पतीशास्र् आणि प्राणीशास्र् घेऊम पदवी मिळवलेली असावी ही प्रमुख अट आहे. तसंच इतिहास, पुरातत्व शास्र् याही विषयाच्या पदवीधरांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमासाठीसुद्धा प्रवेश परीक्षा घेतली जाते.

प्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी

Loading...

नोकरी आणि व्यवसायाच्या भरपूर संधी - केंद्र सरकार आणि राज्य सकरा आपापल्या परीने पर्यटन विकासावर भर देत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हा अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा मोठा उद्योग बनला आहे. पर्यटनाच्या ठिकाणी तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून या क्षेत्रामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या भरपूर संधी उपबल्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...