आरोग्याशी खेळ ! रिकाम्या पोटी कॉफी पिता? हे नक्की वाचा

आरोग्याशी खेळ ! रिकाम्या पोटी कॉफी पिता? हे नक्की वाचा

कॉफी कोणत्या वेळेला प्यायली जाते, यावर तुमच्या आरोग्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम अवलंबून आहेत.

  • Share this:

चहाप्रेमींप्रमाणे कॉफीचेही अनेक चाहते आपल्याला आसपास नेहमी पाहायला मिळतात. ज्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट बऱ्याचदा कॉफीच्या सेवनानंच होतो. कॉफी पिणं हे जणू काही त्यांच्या आयुष्याचा भागच झालेलं असतं. पण कॉफी कोणत्या वेळेला प्यायली जाते, यावर तुमच्या आरोग्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम अवलंबून आहेत. तुम्हाला रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का? तर मग वेळीच ही सवय बदला. कारण यामुळे तुमचं आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

(वाचा : 'या' कारणामुळे भारतीय युवकांमध्ये धूम्रपान करण्याचं प्रमाण सर्वाधिक)

कॉफी पिण्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसे तोटेदेखील आहेत. पण रिकाम्या पोटी कॉफी पिणं कधीही टाळा. या सवयीमुळे तुमच्या निरोगी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत, ही बाब लक्षात घ्या. रिडर्स डायजेस्टमध्ये छापण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, नाश्ता करण्यापूर्वी तुम्ही कॉफीचं सेवन केलं तर तुमच्या शरीरात कोर्टीसॉल या रसायनाचं प्रमाण वाढतं. कोर्टीसॉल रसायन शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती, चयापचय आणि ताण प्रतिसाद या सर्व प्रक्रियांवर नियंत्रण आणण्याचं कार्य पार पाडत असतं. अशातच सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचं सेवन केल्यास तणाव वाढण्याची शक्यता असते.

(वाचा :नदीवर तरंगणारं हॉटेल : बांधून तयार होण्यापूर्वीच बुकिंग सुरू)

एक रीसर्चनुसार, रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये मूड स्विंग होण्याच्या तक्रारी निर्माण होतात. यामुळे अ‍ॅसिडिटी, हृदयात जळजळ, अल्सर यांसारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. सोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. नियमित रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय असल्यास चिंता, पॅनिक अटॅक येण्याची भीती असते.

(वाचा :जगातूनच नाहिशी होऊ शकते तुमची ही आवडती गोष्ट...!)

- अपचन, बद्धकोष्ठतेचाही त्रास वाढू शकतो .

- गर्भवती महिलांनी रिकाम्या पोटी कॉफी पिणं टाळावं.

- कॉफी पिण्याची अधिकच सवय असल्यास कॉफीसोबत मल्टी ग्रेन (धान्य)बिस्किट किंवा बदाम खाऊ शकता.

कोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल

First published: July 16, 2019, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading