रिलेशनशिप दीर्घ काळ टिकवायचं आहे ? मग आपल्या पार्टनरसाठी हे नक्की करा

Love life : एखाद्यावर प्रेम करणं सोपं असलं तरी तेच प्रेम कायम टिकवणं तितकंच कठीण असतं. नात्यात नावीन्य जपण्यासाठी प्रेमाचं जतन करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 09:41 PM IST

रिलेशनशिप दीर्घ काळ टिकवायचं आहे ? मग आपल्या पार्टनरसाठी हे नक्की करा

एखाद्यावर प्रेम करणं सोपं असलं तरी तेच प्रेम कायम टिकवणं तितकंच कठीण असतं. नात्यात नावीन्य जपण्यासाठी प्रेमाचं जतन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण नात्यातलं प्रेम आणखी वाढावं, यासाठी अनेकांकडून हवे तसे प्रयत्न केले जात नाहीत. याच कारणामुळे एकमेकांचा कंटाळून येऊन अनेक जण आपलं नातं संपुष्टात आणतात. कारण त्यांच्या नात्यातला जीवच निघून गेलेला असतो. तुम्हालाही जर नात्यातला ओलावा कायम टिकवायचं असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता, एकमेकांना जपायला शिका.

1. नातं घट्ट करण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी तुम्हाला एकत्र करणं शक्य आहे, त्यासाठी आवडीनं वेळ काढावा. उदाहरणार्थ सकाळचा नाश्ता, जेवणं आणि झोपण्याची वेळ. यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत अधिकाअधिक वेळ मिळेल. नात्यातली ओढ आणि एकमेकांबद्दलची आत्मीयताही वाढण्यास मदत होईल.

2. एखाद्या गोष्टीचा जाहीररित्या स्वीकार करणं, ही बाब नात्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसह बाहेर फिरायला गेलात तर कोणत्याही खास कारणाशिवायच त्याचा/तिचा हात पकडा आणि तू माझ्यासाठी स्पेशल आहेस, याची जाणीव त्यांना करून द्या. अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतून प्रेम व्यक्त केल्यास याचा फायदा नक्कीच होईल.

(वाचा :तुम्हीदेखील पार्टनरचा मोबाइल लपूनछपून तपासता? मग हे नक्की वाचा)

3. कोणतंही नातं जिवंत राहावं असं वाटत असल्यास  त्यासाठी वेळ देणंही अतिशय गरजेचं आहे. तुम्ही दोघंही जॉब करत असाल तर सुट्टीच्या दिवशी एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना वेळ द्या. एकमेकांशी गप्पा मारा. ऑफिसमध्ये असताना शक्य असल्यास फोनवरून एकमेकांशी संपर्क साधा. पण हे करत असताना कामावर कोणताही परिणाम होऊ देऊ नका. कामावरून घरी जाताना डिनर डेटचं नियोजन करा. हेही शक्य नसेल तर घरातल्या घरातच कँडल लाइट डिनरचं प्लानिंग आखा.

Loading...

(वाचा : तुमच्या पार्टनरसोबत फिरायला जा फक्त 5000 च्या बजेटमध्ये)

4. केवळ रिलेशनशिपमध्ये असून चालत नाही. तर तुम्हाला पार्टनरसाठी असलेलं प्रेमदेखील व्यक्त करता आलं पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्हाला प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल तेव्हा ती जाऊ देऊ नका. कारण, यामुळे तुमचं नातं आधीपेक्षा अधिक घट्ट होण्यास नक्कीच मदत होईल.

5. बहुतांश वेळा जे काम शब्द करू शकत नाहीत, तेच काम स्पर्शाद्वारे करून नात्यात जादू आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराच्या कपाळाचं चुंबन घेऊन त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान कोणीही घेऊ शकत नाही, याची जाणीव त्यांना करून द्या. जोडीदार तणावात असेल, थकाला असेल तर त्याला एका जादूची झप्पी द्या. आपली काळजी करणारं कोणीतरी हक्काचं माणूस आयुष्यात आहे, या विचारनंच तो/ती देखील सुखावले जातील.

(पाहा :SPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल)

गुगल पोहोचलं तुमच्या बेडरूमपर्यंत, तुमची माहिती सुरक्षित तर आहे ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...