लोकांना स्वभाव ओळखण्यासाठी फायद्याच्या ठरतील तुम्हाला 'या' 5 टिप्स

लोकांना स्वभाव ओळखण्यासाठी फायद्याच्या ठरतील तुम्हाला 'या' 5 टिप्स

एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? हे जाणून घेण्याची आपली सगळ्यांचीच इच्छा असते

  • Share this:

मुंबई, 14 जून : एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? हे जाणून घेण्याची आपली सगळ्यांचीच इच्छा असते. पण त्यासाठीचे प्रयत्न अपुरे ठरतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही समोर आलेल्या व्यक्तीचा स्वभाव लगेच ओळखू शकाल.

1 - जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या म्हणजे शब्द, बॉडी लँग्वेज आणि टोन. समोरच्या व्यक्तीला जे काही सांगायचं असंत त्यात 7 टक्के वाटा हा त्याच्या शब्दांचा असतो. 55 टक्के ही त्याची बॅडी लँग्वेज सांगत असते आणि 30 टक्के परिणाम हा त्याच्या टोनचा असतो. तर ती व्यक्ती कशी असू शकते हे त्याच्या पेहरावावरून ओळखता येतं.

माणसं ओळखायला नाही, तर समजायला शिका

2 - जर कुणी सूट घातला असेल आणि त्याचे बूटरी चमकदार असतील तर या गोष्टीची जास्त शक्यता असते की, ती व्यक्ती अधिक महत्त्वाकांक्षी आहे. तसंच जर कोणी जीन्स आणि टीशर्ट घातला असेल तर ती व्यक्ती कंफर्ट आणि कॅज्युअल आहे असं समजावं.

3 - जी व्यक्ती अंगठी, ताईत आदी प्रकार घालचे ती व्यक्ती धार्मिक असण्याचा अंदाज लावता येतो. लोकांच्या चालण्यावरून आणि त्यांच्या हावभावावरूनही काही अनुमान लावले जाऊ शकतात. जी व्यक्ती ताठ मान करून चालते त्या व्यक्तीमध्ये भरपूर आत्मविश्वास आसतो. अडखळत चालणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. ताठ आणि छाती पूढे काढून चालणारी व्यक्ती अहंकारी असू शकते.

'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

4 - बॉडी लँग्वेज आणि शब्दांवरूनसुद्धा तुम्ही लोकांची पारख करू शकता.

5 - तसंच जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा तुमच्या कोणत्या प्रकारचे भाव निर्माण होतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. मनात उत्साह निर्माण होतो की निराशा निर्माण होते की भय निर्माण होतं त्यावरुनसुद्धा तुम्ही भेटणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे गेस करू शकता.

First published: June 14, 2019, 10:15 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading