नवी दिल्ली, 27 डिसेंबर : अनेकांचा लाजाळू स्वभाव असतो. लाजाळू (Shyness) स्वभाव असणं वाईट नाही पण, अशा व्यक्ती या स्वभावामुळे जीवनातील अनेक सोप्या संधी गमावतात. ज्या कदाचित त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. मग ते करिअरमधील वाढीशी संबंधित असो किंवा मैत्री-लोकांशी संबंध वाढवण्याची संधी असो. आपण संकोच करतो आणि वेळ निघून जाते. मग गमावलेल्या संधीची खंत नेहमीच आपल्याला सतावत राहते. यासाठी आपण स्वतःच्या विचारसरणीत कोणते बदल (Overcome) घडवून आणू शकतो. जेणेकरून आपल्यातील मनातील संकोच आणि लाजाळूपणा कमी होईल आणि आपण इतरांप्रमाणे मुक्तपणे जीवनाचा (How To Overcome Shyness) आनंद घेऊ शकू.
1. लाज किंवा संकोच वाटणं ही वाईट सवय नाही
सर्वप्रथम, स्वतःला ठामपणे सांगा की, लाजाळू असणं ही वाईट सवय नाही. अशा पद्धतीनं स्वतःला आपण आहोत तसं स्वीकारल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांमध्ये मिसळताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता जाऊ शकाल.
2. अपमान होण्याची भीती सोडा
कोणीही तुमचा अपमान करू शकेल एवढी तुमची किंमत कमी नाही, हे स्वतःच्या मनावर बिंबवा. तुमचा अपमान करणं इतकी सोपी गोष्ट नाही, हे पुढल्या खेपेस कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमाला जाताना किंवा लोकांमध्ये मिसळताना ही बाब स्वतःच्या मनावर ठसवा. खरं तर अपमान होण्याच्या विचारानं बहुतेक लाजाळू लोक गर्दीत स्वतःला दूर ठेवतात.
3. नाकारलं जाणं सहजतेनं घ्या
काही वेळा आपण गर्दीत किंवा लोकांमध्ये जायला संकोच करतो कारण, आपल्याला वाटतं की इतर लोक आपला तिरस्कार करतात किंवा आपण त्यांना आवडत नाही. मात्र, हा तुमचा भ्रम असू शकतो. अशा गोष्टी घडत असल्या तरी त्या सहजतेनं घ्या.
4. याप्रमाणं करून पाहा
तुमचा लाजाळूपणा कमी करण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी करा. तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवा. मित्रांसोबत होणाऱ्या अगदी लहान-सहान सार्वजनिक प्रसंगांतही हजेरी लावा. या छोट्या कार्यक्रमांमुळं तुम्हाला अनेक लोकांसमोर मोकळेपणानं येण्याची आणि बोलण्याची प्रेरणा मिळेल.
5. मेहनत घ्या, शिकत रहा, स्वतःमध्ये सुधारणा करा
तुमचं काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी दररोज प्रयत्न करा. नवीन शिकत रहा. काहीतरी नवीन आणि अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत रहा. स्वतःमध्ये सुधारणा करत रहा. तुमच्या क्षेत्रात आणि एखाद्या छंदात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा, मेहनत घ्या. कृतीशीलतेमुळं तुमच्या आपोआप आत्मविश्वास येत राहील.
हे वाचा - Kitchen Tips: माशांच्या रेसिपीमुळे सर्वत्र वास येतोय? या ट्रिक्सने चुटकी सरशी दुर्गंधी घालवा
6. ताठ मानेनं बोला
जेव्हा तुम्ही कोणाशीही बोलता, तेव्हा ताठ मान ठेवून लोकांच्या नजरेला नजर देऊन बोला. असं केल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा संकोचही कमी होईल.
7. स्वत:ला कमी लेखू नका
आरशात बघा आणि बोला. स्वतःला आठवण करून द्या की, तुम्ही जे काही करता ते तुम्ही चांगल्या प्रकारे करत आहात. त्यात तुम्ही तज्ज्ञ आहात. अशा बाबी तुम्हाला गर्दीतही तुमचं महत्त्व लक्षात आणून देतात.
8. आपल्या लुककडे लक्ष द्या
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही चांगले दिसत नाही तर, तुमच्या दिसण्याकडं विशेष लक्ष द्या. तुमचं दिसणं सुधारण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. मात्र, दिसण्यापेक्षाही लोकांना आत्मविश्वासू आणि चांगल्या प्रकारे बोलणारे आणि विचार करणारे लोक आवडतात, ही बाबही लक्षात घ्या.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Personal life