हॉटेलचे पदार्थही महागणार! जाणून घ्या काय आहे भाववाढीचे कारण

हॉटेलचे पदार्थही महागणार! जाणून घ्या काय आहे भाववाढीचे कारण

हॉटेलमध्ये जाण्याचा विचार करताय? थांबा मग ही आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जाणं होणाऱ्यांचा खिशालाही नव्या वर्षाआधी मोठी कात्री लागणार आहे. नव्या वर्षाआधीच हॉटेलमधील जेवण दुप्पट महागण्याची चिन्हं आहे. इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याची आणि काही भाज्यांची किंमत वाढल्यानं वर्षाच्या अखेरीस हॉटेलमध्ये पार्टी करणं म्हणजे खिसा रिकामा करू येण्यासारखं होणार आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी विचार करा.

सध्या चांगल्या प्रतिच्या कांद्याची किंमत 100 रुपये प्रतिकिलोखाली आली असली तरीही शहरांमध्ये कांद्याचे दर वर्षभरात 5 वेळा वाढल्यानं हॉटेल व्यवसायिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये 22 टक्के कांद्याचे दर घटणार असल्याची माहिती शुक्रवारी राज्यसभेत देण्यात आली आहे. दरम्यान तुर्कस्थानातून कांद्याची मोठ्या प्रमाण आयात करण्यात आली असून हा कांदा 20 डिसेंबरनंतर बाजारात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा कांदा 44 रुपये प्रतिकिलो दराने विकला जाण्याची शक्यता आहे.

81 टक्क्यांनी वाढले कांद्याचे भाव- मागच्या महिन्यात बाजारात जवळपास 81 टक्क्यांनी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. राज्यसभेत कांद्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मंगळवारी कांद्याचा भाव अवघ्या 101.35 रुपये प्रतिकिलो कांद्याचा दर होता.

कांद्याची किंमत जरी येत्या काळात 30 टक्क्यांनी घसरणार असली तरीही मधल्या दरवाढीचा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसणार आहे. त्यामुळे सध्या हॉटेलच्या जेवणातून हद्दपार झालेला कांदा जरी परत आला तरीही त्याची किंमत दुपटीनं वाढणार असल्यानं ग्राहकांचा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील भागांमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकावर मोठी संक्रांत आली होती. त्यामुळे कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र तुर्कस्थानातून आयात केलेल्या कांद्यामुळे राज्यातील कांद्यावर मोठा परिणाम होणार आहे. एकूणच महागाईनं होरपळलेल्या सर्वसामान्यांचे खिसे हॉटेलात मात्र पुरते रिकामे होणार असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पार्टी करण्याचा विचार असेल तर सांभाळून आणि खिसा पाहून हॉटेलमध्ये जाण्याचा विचार करा. अन्यथा आनंदाच्या भरात खिशात खडखडाट अशी अवस्था व्हायला नको.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 14, 2019, 2:42 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading