पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा 'या' 6 गोष्टी

पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा 'या' 6 गोष्टी

मुलं चांगल्या सवयींसोबतच वाईट गोष्टीसुद्धा शिकतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणंही आवश्यक असतं

  • Share this:

मुंबई, 23 जून : लहान मुलं मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात तसंच आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं आचरण करतात. त्यामुळे मुलं चांगल्या सवयींसोबतच वाईट गोष्टीसुद्धा शिकतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणंही आवश्यक असतं. तुमचं मुल पहिल्यांदाच शाळेत जात असेल तर त्यांना कोणत्या गोष्टी तुम्ही समजावून सांगायला हव्यात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 - अनेक मित्र-मैत्रिणी त्यांना जोडायला शिकवा. यामुळे ते सगळ्यात मिळून मिसळून राहतील.

2 - मुलांना स्वतःच्या हाताने जेवण्याची सवय लावा. त्याआधी त्याने किंवा तिने हात व्यवस्थित धुतले की नाही याकडे लक्ष ठेवा.

3 - मोठ्याचा आदर करायला त्य़ांना शिकवा. त्याचबरोबर त्यांना थँक्यू आणि सॉरी या शब्दांचं महत्त्व पटवून द्या.

तणावमुक्त जीवन जगायचं असेल, तर दररोज करा 'या' 5 आवश्यक गोष्टी

4 - शाळेत किंवा परिसरात वापरताना इतरांशी कसं बोलावं, कसं वागावं हे देखील त्यांना समजावून सांगा. भांडण किंवा मारामारी करू नये. जर त्यांना एखादं मुल त्रास देत असेल तर शिकक्षकांसोबतच पालकांनाही त्याने त्याबाबत सांगायला हवं.

5 - शाळेत गेल्यावर मुल ब्लँक राहू नये म्हणून त्यांना बेसिक गोष्टी शिकवा.

एक असं शहर जिथे गेल्या 70 वर्षात कुणाचाच मृत्यू झाला नाही

6 - मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्या. विशेषतः पर्सनल हायजीन बाबत त्यांना सांगा. शाळेत टॉयलेटला जाताना शिक्षकांना किंवा मित्र-मैत्रिणींना सागून जाण्याबाबत त्यांना सांगा. तसंच इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यांना स्वच्छता कशी राखायची हे देखील सांगा.

First published: June 23, 2019, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading