पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

आजही अनेकांना वाटतं की, स्तनांचा कर्करोग फक्त महिलांना होतो.. पण असं काही नाही. पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो.

  • Share this:

न्यूयॉर्क : आजही अनेकांना वाटतं की, स्तनांचा कर्करोग फक्त महिलांना होतो.. पण असं काही नाही. पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो. हॉलिवूड गायक बियान्सेचे वजील मॅथ्यू नोल्सनेही याचा खुलासा केला की ते स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. bbc.co.uk या वेबसाइटच्या मते मॅथ्यू यांनी गुड मॉर्निंग अमेरिका या टीव्ही शोवर आपल्या आजाराचा खुलासा केला.

पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं-

पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग हा फार दुर्मिळ आजार आहे. त्यातही 60 वर्षांहून अधिक वयाच्या पुरुषांना हा आजार होतो. पुरुषांमध्ये या आजाराची टक्केवारी कमी असल्यामुळे याची जागरुकताही कमी आहे. त्यामुळे याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे स्थिती फार गंभीर होते. जेव्हा आजाराचं निदान होतं तेव्हा उशीर झालेला असतो.

छातीवर गाठ येणं-

जर तुमच्या छातीवर गाठ झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या गाठी दुखत नाहीत. जस जसा कर्करोग वाढत जातो तशी ही गाठ छातीपासून वाढत जाऊन मानेपर्यंत जाते.

निप्पलचं तोंड आत जाणं-

ट्यूमर वाढण्यासोबतच लिंगामेन्ट स्तनाच्या आत खेचलं जाऊ लागतं, त्यामुळे निपल्स आतल्या बाजूला ओढलेले दिसतात. याशिवाय निपलच्या आजूबाजूची त्वचा रूक्ष होऊ लागते.

निप्पल डिस्चार्ज-

जर तुम्हाला तुमच्या शर्टवर अनेकदा कोणते डाग दिसत असले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बियॉन्सचे वडील मॅथ्यू यांनी ही आपल्या प्रकृतीबद्दल सांगितलं की त्यांना कर्करोगाबद्दल फार उशीरा कळलं. त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग दिसू लागल्यानंतर त्यांना या आजाराबद्दल कळलं.

मुरमाप्रमाणे जखम-

स्तनाच्या कर्करोगात ट्यूमर त्वचेवरूनच वाढतो त्यामुळे निप्पलवर उघडपणे घाव दिसू लागतात. हा घाव एखाद्या मुरमाएवढा असतो. ही लक्षणं दिसली तर डॉक्टरांना लगेच संपर्क करा.

आता औषधं नाही तर हे पदार्थ खाऊन मिळवा शांत झोप

लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आजच खाणं सोडा या भाज्या!

Diabetes Diet: हे नाश्ताचे प्रकार मधुमेहाच्या रुग्णांना आहेत वरदान

बॉयफ्रेंडने खाऊ घातली पाणीपुरी, नंतर झाले असे काही की.... पाहा हा Viral Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 11:44 AM IST

ताज्या बातम्या