भारताच्या 'या' शहरातल्या हॉटेलमध्ये वेटरऐवजी चक्क रोबो सर्व्ह करणार

आता ना तुम्हाला सेल्फ सर्व्हिसची गरज पडेल, ना कोणता वेटर तुमच्यापर्यंत पदार्थ आणून देईल

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 09:53 PM IST

भारताच्या 'या' शहरातल्या हॉटेलमध्ये वेटरऐवजी चक्क रोबो सर्व्ह करणार

नवी दिल्ली, 17 जून : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर शक्यतो एखादा वेटर आपल्याला पदार्थ सर्व्ह करतो. जर सेल्फ सर्व्हिसचं ऑप्शन असेल, तर तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्हाला स्वतःलाच घ्यावं लागतं. पण आता ना तुम्हाला सेल्फ सर्व्हिसची गरज पडेल, ना कोणता वेटर तुमच्यापर्यंत पदार्थ आणून देईल. कारण पिंक सिटी म्हणून ओळख असलेल्या जय़पूरमधील रेस्टॉरंट्स आणि हॉटेलसमध्ये लवकरच ही सुविधा रोबो देणार आहे. अगदी स्मार्टफोनच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही या रोबोंना ऑर्डर देऊ शकाल.

जयपुरचे भुवनेश मिश्रा, नीलिमा मिश्रा आणि मयंक मेहरचंदानी या तिघांनी मिळून हे रोबो तयार केलेत. 3 वर्षांची अथक मेहनत करत रोबोट क्लब फर्स्टच्या माध्यमातून त्यांनी 2 हायटेक रोबोट तयार केले आहेत. आर्टिफीशियल इंटेलिजेंस (AI) रोबो तयार करण्याची कल्पना त्यांना 2013 मध्ये सुचली आणि तेव्हापासूनच त्यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली.

शिफ्टमध्ये काम करताना लक्षात घ्या 'हे' आरोग्याविषयीचे धोके

स्मार्टफोनच्या सहाय्याने करता येईल ऑपरेट

'सोना1.5' आणि 'सोना.5' अशी त्यांना या दोन रोबोंची नावं ठेवली असून, दोन्ही रोबो स्मार्टफोनच्या सहाय्याने ऑपरेट येतात. या दोन्ही रोबोंमध्ये असे काही फीचर्स त्यांनी अॅड केले आहेत, ज्यामुळे त्यांची गणना जागतीक स्तरावर होऊ शकते. हे दोन्ही रोबो पूर्णतः भारतातच डिझाईन करण्यात आले असून, 'सोना1.5' आणि 'सोना.5' चे डिझाइन्स जरा हटके आहेत.

Loading...

ताशी 600 किमी वेगाने धावणार चीनची 'ही' ट्रेन

''इतर रोबोंपेक्षा हे दोन्ही रोबो वेगळे आहेत. नेव्हिगेशन आणि मॅपिंगवर काम करतात'', असं भुवनेश सांगतात. भविष्यात ऑफिस, हॉस्पिटल्स आणि कारखान्यांमध्ये वापरण्यासाठीसुद्धा रोबो तयार करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...