Elec-widget

Instagram जास्त वापरताय? तुम्ही देताय 'या' गंभीर आजारांना निमंत्रण

Instagram जास्त वापरताय? तुम्ही देताय 'या' गंभीर आजारांना निमंत्रण

हल्ली सोशल मीडियाचा वापर हा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

  • Share this:

हल्ली सोशल मीडियाचा वापर हा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. बहुतांश जणांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सोशल मीडियाच्या वापरानंच होतो. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्रामव्यतिरिक्त कित्येक अशा सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत, ज्यावर स्टेटस अपलोड करणं, फोटो शेअर करणं, व्हिडीओ शेअर करणं आणि मेसेज पाठवणं यांसारख्या अनेक गोष्टी दिवसभर सुरूच असतात. या लोकांसाठी सोशल मीडियाशिवाय जगणं म्हणजे अशक्यच गोष्ट आहे, असं म्हटलं खोटं ठरणार नाही.  पण तुम्हाला माहिती आहे का? Instagramचा जास्त वापर आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. Instagramवर सतत अ‍ॅक्टिव्ह असणारी लोक कित्येक गंभीर आजारांना फुकटात निमंत्रण देत आहेत, याची कदाचित त्यांना माहिती नसेल.

(वाचा :सख्ख्या भावाच्या मुलाला जन्म देणारी ही महिला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!)

आरोग्यासाठी इंस्टाग्राम हानिकारक

Instagramनंतर दुसऱ्या क्रमांकावर स्नॅपचॅट हे अ‍ॅप आहे. याच्या वापरामुळे आपल्या मेंदूवर अतिशय वाईट परिणाम होतो. यामुळे तरुण वर्गातील बरीच मंडळी नैराश्य, झोप न येणं यांसारख्या गंभीर आजारांना बळी पडतात. ही अ‍ॅप्स वापरल्यानं होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावासंदर्भात संशोधन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये इंस्टाग्राम आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे.

(वाचा :Whatsapp वापरणं मानसिक आरोग्यासाठी चांगलं की वाईट?)

Loading...

आईवडिलांपासून दुरावली जातात मुलं

तरुण वर्गामध्ये इंस्टाग्रामची सर्वात जास्त क्रेझ आहे. आपले फोटो निरनिराळे फिल्टर वापरून सोशल मीडियावर अपलोड करण्याचा ज्याचा-त्याचा प्रयत्न असतो. यामुळे बरेच जण खासगी आयुष्यातला आनंद बाजूला सारून मोठ्या प्रमाणात आभासी जगातच वावरत असल्याचं दिसून आलं. परिणामी घरात भांडण होण्याचं प्रमाण वाढत आहे. मुलं मोबाइलवरच इतका वेळ असतात की त्यांना आईवडिलांची आठवणच येत नाही.

आभासी जीवनातच अधिक वेळ खर्च होत असल्यानं बरेच जण आयुष्य जगणंच विसरून गेली आहेत.

(वाचा : 'हे' नुकसान समजल्यानंतर तुम्ही चहासोबत बिस्किट खाणं लगेचच बंद कराल)

VIDEO : भयंकरच! माजी आमदाराच्या पाण्याच्या बाटलीत आढळली पाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 09:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...