• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Night Jasmine Benefits : जाणून घ्या रातराणीचं रोप घरात का लावावं? मिळतील 5 जबरदस्त फायदे

Night Jasmine Benefits : जाणून घ्या रातराणीचं रोप घरात का लावावं? मिळतील 5 जबरदस्त फायदे

रातराणीच्या फुलाला नाईट ब्लूमिंग जस्मिन (Night blooming jasmine) असंही म्हणतात. ही वनस्पती केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर तुमच्या आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : रातराणीच्या फुलाला नाईट ब्लूमिंग जस्मिन (Night blooming jasmine) असंही म्हणतात. ही वनस्पती केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर तुमच्या आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. रातराणीच्या रोपामध्ये अँटिऑक्सिडेंटस, दाहविरोधी (अँटी-इंफ्लेमेटरी - anti-inflammatory) आणि जंतूप्रतिबंधक (अँटी-बॅक्टेरियल - anti-bacterial) गुणधर्म असतात. सायटिका समस्येत उपयुक्त रातराणी वनस्पतीची तीन ते चार पानं घेऊन पाण्यात उकळा. आता हे पाणी गाळून घ्या आणि दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी सेवन करा. सायटीकाच्या दुखण्यात आराम मिळेल. संधिवात रातराणी वनस्पतीची पानं, फुलं आणि साल २०० मिली पाण्यात उकळून घ्या. एक चतुर्थांश म्हणजे 50 मि.ली. राहेपर्यंत ते उकळवा. ते गरम-गरम प्या. याचा संधिवातात उपयोग होईल. आर्थरायटिस रातराणी वनस्पतीची पानं पाण्यात उकळून दिवसातून एकदा प्या. यामुळं कोणत्याही प्रकारच्या वेदना आणि सूज यांमध्ये आराम मिळेल. हे वाचा - Red Ladyfinger : लाल भेंडीला बाजारात का आहे इतकी मागणी; चौपट मिळतोय जास्त दर सर्दी, खोकला आणि सायनसमध्ये रातराणीची पानं घेऊन बारीक करावी. याच्या पानांचा रस काढून मधासोबत सेवन करा. सर्दी, खोकल्यामध्ये आराम मिळेल. याशिवाय, त्याची पानं आणि फुलं उकळून चहाही बनवता येतो. त्यात तुळशीची काही पानंही टाका. हा चहा प्यायल्यानं कफाच्या समस्येत आराम मिळेल. ताप रातराणी वनस्पतीची साल 3 ग्रॅम आणि तिची दोन ग्रॅम पानं दोन किंवा तीन तुळशीच्या पानांसह उकळवा. दिवसातून दोनदा ते प्या. याचा तापावर चांगला गुण येईल. हे वाचा - How to reduce belly fat : लठ्ठपणा कमी करण्याचे हे आहेत सोपे उपाय; पोटावरील चरबीही होईल गायब चिंता रातराणी म्हणजेच नाईट जस्मिन ऑइलचा वापर अरोमाथेरपीमध्येही केला जातो. हे तणाव आणि चिंता दूर करते. हे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवते आणि मूड नियंत्रित करते.
  Published by:News18 Desk
  First published: