मुंबई, 13 जून : उन्हाळ्यातला साठवणीचा शेवटचा पदार्थ म्हणजे कैरीचं लोणचं. तोपर्यंत कैरीचा तक्कू आणि तात्पुरतं लोणचं, मेथांबा, किसवंती, आंबा-डाळ, कांद-कैरी असे सगळे पदार्थ मनसोक्त खाऊन झालेले असतात. कैरीला निरोप देताना मात्र तिची आठवण म्हणून वर्षभराचं टिकाऊ लोणचं घातलं जातं. आज आम्ही तुम्हाला पाहताक्षणी जीभेला पाणी सुटेल असं कैरीचं चटकदार लोणचं कसं तयार करायचं हे सांगणार आहोत.
साहित्य - 1 किलो कैरी, 100 ग्रॅम मोहरीची डाळ, 500 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम धने, 25 ग्रॅम मेथीचे दाणे, चवीनुसार मीठ आणि तिखट, 2 टेबलस्पून लवंग, हिग, तिळाचं तेल, जायफळ पुड आणि दालचिनी
गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी बनवा 'हा' पदार्थ
कृती - सुरुवातीला कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करुन घ्या. गूळ किसून घ्या. धने आणि मेथीचे दाणे याची पूड तयार करून ही पूड मोहरीच्या डाळीबरोबर भाजून घ्यावी. एका मोठ्या परातीत तिखट, हिंगाची पूड आणि वर सांगितलेले सगळे मसाले एकत्र करून त्यावर गरम तेल टाकावं. त्यात किसलेला गूळ टाकून हे मिश्रण एकत्र करावं. त्यानंतर कैरीच्या फोडी घालून त्यावर झणझणीत फोडणी घालावी. सगळं एकक्ष कालवून एका बरणीत भरून ठेवा.
जागतिक पोहे दिवस : जगात सगळ्यात झटपट तयार करता येतो 'हा' पदार्थ
त्यानंतर अधूनमधून बरणीतलं लोणचं हलवावं, जेणेकरून ते चांगलं मुरेल. महिन्याभरानंतर जेव्हा ते एका बाउलमध्ये तुम्ही काढाल, तेव्हा पाहताक्षणी तुमच्या जीभेला पाणी नाही सुटलं तर नवल.