लग्नाला झाली 72 वर्षं, शंभरीच्या आजी-आजोबांचा VIDEO तरुणाईत एकदम hit

लग्नाला झाली 72 वर्षं, शंभरीच्या आजी-आजोबांचा VIDEO तरुणाईत एकदम hit

सध्या एका 101 वर्षांचे आजोबा आणि 90 च्या आजींचा व्हिडिओ नव्या पिढीतील प्रेमी युगुलांमध्ये हिट ठरलाय. पाहा काय आहे यांच्या love story चं सिक्रेट

  • Share this:

मुंबई, 6 एप्रिल: लग्नासाठी योग्य जोडीदार मिळण्यापासून तो संसार टिकण्यापर्यंत अनेक समस्या सध्या भारतीय समाजात दिसतात. काहींची लग्न होतात पण त्यांचे घटस्फोटही तितकेच लवकर होतात. अशाच वातावरणात सध्या एक व्हिडिओ नव्या पिढीतील प्रेमी युगुलांना आणि नवविवाहितांना (Newly Married) सुखी संसाराची सूत्रं सांगतोय. हो तुम्ही बरोबर ऐकलंत. सोशल मीडियावर अनेक विषयांचे व्हिडिओ असतात. ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बॉम्बे (Humans of Bombay) नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये 101 वर्षांचे आजोबा आणि 90 वर्षांच्या आजी हे आपल्या 72 वर्षांच्या यशस्वी विवाहित आयुष्याची सूत्रं सांगताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये आजोबा आणि आजी एका खोलीत खुर्चीवर बसले आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला बर्फी चित्रपटातलं ‘इतनी सी खुशी’ हे गाणं वाजत असतं आणि एकेक पाटी येते आणि आपल्याला व्हिडिओतील आजी-आजोबांची सूत्र उलगडून दाखवते.

आजोबा आजींना पुष्पगुच्छ देतात आणि मग सुरू होतात यशस्वी सहजीवनाची सूत्रं.

हा व्हिडिओ पोस्ट करून त्यासमोर असं कॅप्शन लिहिलंय, ‘सतत 72 वर्षांचं साहचर्य (Married last 72 years) कसं साधतं? हे जोडपं सांगतंय त्याचं रहस्य.’

दिवसातून एकदातरी दोघांनी एकत्र जेवा, एकमेकांचा हात काहीही झालं तरी सोडू नका. वादावादी झाली तरीही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा सल्ला या आजी-आजोबांनी (Grandpa-Grandmother) नवदाम्पत्य आणि प्रेमात पडलेल्या तरुण-तरुणींना दिला आहे. त्याचबरोबर कायम सोबत करण्याच्या वचनाची ते आठवण करून देतात आणि हा व्हिडिओ संपतो. व्हिडिओत वापरलेली सहजीवनाची व्हिज्युअल्सही (Visuals) पाहण्यासारखी आहेत. या व्हिडिओला 4,12,201 लाइक्स मिळाले असून तो अनेकदा शेअर झाला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

(हे वाचा: लग्नाच्या दिवशीच लोचा झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा  )

एकानी लिहिलंय, ‘व्हिडिओमध्ये जसं आजी आजोबांना हात वर घ्यायला मदत करतात ते खूपच विलक्षण आहे. आयुष्याच्या शेवटी आपल्या सगळ्यांनाच असं साथ देणारं कुणीतरी हवंय. त्यांना खूप शुभेच्छा.’ सोशल मीडिया सेन्सेशन डॉली सिंगने लिहिलंय, ‘अरे देवा मला अचानक रडू कोसळतंय. (म्हणजे आजी-आजोबांचं प्रेम पाहून डोळ्यांत अश्रू आलेत.)’ या आजी-आजोबांचं Elderly Grandparents हे स्वतंत्र इन्स्टाग्राम पेजही आहे. तुम्ही तिथं जाऊनही आपलं प्रेम व्यक्त करू शकता. या आजी-आजोबांनी महत्त्वाची सूत्रं दिली आहेत. ती त्यांना नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

First published: April 7, 2021, 7:25 AM IST

ताज्या बातम्या